आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांना रुग्णालयात सुरक्षा पुरवा; उच्च न्यायालयाचे निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणारी मारहाण व वाद टाळण्यासाठी सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना पोलिस सुरक्षा पुरवा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्ते अफाक मानदिव्या यांनी अलीकडेच मार्डच्या डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.

सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले, रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना अनेकदा मारहाण होते. त्यामुळे रुग्णालयात वावरताना डॉक्टर तणावात असतात. त्यावर मार्डच्या वतीने सांगण्यात आले. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकार काहीही उपाययोजना करत नाही. अनेकदा डॉक्टरांवर हल्ला होताे. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारला डॉक्टरांना रुग्णालयात पोलिस सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी २१ जून रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत सरकारला त्यांची भूमिका न्यायालयात मांडावी लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...