आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री मंत्रालयात ‘अवतरले’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मंत्रालय म्हणजे राज्याचे शकट चालवण्याचे मुख्य स्थान. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री-अधिकार्‍यांनी येथे बसून कारभार हाकायचा असतो, परंतु आगीनंतर मंत्रालयाचे नूतनीकरण सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात न येणेच पसंत केले होते. जवळ-जवळ दीड महिन्यानंतर बुधवारी ते मंत्रालयात आले. थोडे दैनंदिन कामही केले आणि मंत्रालय नूतनीकरणाच्या कामाचीही पाहणी केली.

मंत्रालयाच्या इमारत नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्ष पाहणी केल्यास त्याचा ‘वेग’ लक्षात येतो. सतत पडत असलेल्या पावसामुळे सगळीकडे चिखल झाला असून चिखलातूनच मंत्रालयात प्रवेश करावा लागतो. एकही प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत नाही. ड्रिलिंगच्या आवाजाने पॅसेजमध्ये बोलणेही कठीण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात न फिरकलेले मुख्यमंत्री बुधवारी दुपारी आले खरे, परंतु लगेचच संरक्षणमंत्र्यांबरोबरच्या पत्रकार परिषदेला गेले. त्यानंतर चार वाजता परत आले. त्यांनी प्रवेशद्वारावरील पायर्‍यांवर जाऊन कामाचा आढावा घेतला. तसेच मंत्रालयाच्या मागील बाजूस जाऊनही आढावा घेतला. या नव्या पायर्‍यांवरच ध्वजवंदन होणार आहे. दरम्यान, बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही बुधवारी नूतनीकरण कामाची पाहणी केली.

भुजबळांनीही केली पाहणी
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही बुधवारी दुपारी मेत्रालयाच्या मेकओव्हरच्या कामाची पाहणी केली. काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबरोबरच नागरिकाची सुरक्षाही लक्षात घ्यावी अशा सूचना कॉन्ट्रॅर्क्टसना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वास्तूरचनाकार अडिरे, यूनिटी कन्स्ट्रक्शनचे किशोर अवर्सेकरही त्यांच्या सोबत होते.