आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीएसआय मारहाणीचे फुटेज अस्पष्ट : आर आर पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळ परिसरात मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने मारहाणीत नेमका कोणत्या आमदारांचा सहभाग होता हे सांगणे कठीण असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.

पाटील म्हणाले, विधिमंडळातील सीसीटीव्ही कॅमे-यात मारहाणीचे चित्रण स्पष्ट झाले नाही. पोलिस महासंचालक संजीव दयाळ आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनीही फुटेजची पाहणी केली. मात्र, यातून काहीही चित्र स्पष्ट झाले नाही. विधिमंडळाच्या इमारतीत 28 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, एकाही कॅमे-यात मारहाणीचे चित्रण योग्यरीत्या झाले नाही, त्यामुळे या घटनेत नेमका कोणाचा सहभाग आहे हे स्पष्ट होत नसल्याचे गृहमंत्री पाटील म्हणाले.


क्लीन चिट देण्याचा प्रयत्न ?
आमदार क्षितिज ठाकूर, राम कदम यांच्यासह पाच-सहा आमदारांनी मारहाण केल्याची सूर्यवंशी यांची तक्रार आहे. मात्र फुटेजमधून पुरावे मिळत नसल्याचे सांगत आमदारांना यातून क्लीन चिट देण्याचा खटाटोप होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.