आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Public Letigation Filed Against Shivsena Bjp For Compaign At High Court

शिवसेना - भाजपकडून नुकसानभरपाईसाठी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ठाणे- मागील वर्षी ठाणे शहरात बंद पुकारणा-या शिवसेना-भाजपकडून 4 कोटींची भरपाई वसूल करावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महापौर निवडणुकीच्या मुद्द्यावरून हा बंद पुकारण्यात आला होता.

सामाजिक कार्यकर्ते शेखर भिसे यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अजय खानविलकर व न्यायमूर्ती ए. पी. भंगाळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने शिवसेनेला नोटीस बजावली. पक्षाचे तीन आमदार व भाजप यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. मागील वर्षी 4 मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते.
रक्कम विद्यार्थ्यांना द्या
आंदोलक युतीचे कार्यकर्ते असल्यामुळे नुकसानीची रक्कम त्यांच्याकडूनच वसूल करावी, या मागणीसाठी भिसे यांनी ही याचिका दाखल केली आहे. आंदोलक पक्षांकडून 4 कोटी रुपये वसूल करावेत. बंदमुळे ज्यांचे नुकसान झाले, त्यांना ही रक्कम द्यावी. नुकसानभरपाई देऊन उरलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी द्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होईल.