आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Public Litiagation In Court For The Miraj Riots Inquary Should Be Do By Cbi

मिरज दंगलीची सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सप्टेंबर 2009 मध्ये मिरज (जि. सांगली) येथे गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या दंगलीची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दंगल प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती सादर करण्यासाठी संबंधित पोलिस अधिका-यांना गुरुवारी (ता. 7) हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने या वेळी दिले.

मिरजमधील दंगलीची झळ सांगली जिल्ह्यातील इतरही भागांना बसली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय हेतूने ही दंगल घडवण्यात आली होती. राजकीय फायदा मिळवण्यासाठी घडवून आणलेल्या या दंगलीत निरपराध माणसांना जीव गमवावे लागले. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दंगलीला 4 वर्षे उलटूनही सांगली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास व्यवस्थितरीत्या केला जात नाही. कारण, जिल्ह्यातील प्रभावशाली राजकारणी मंडळी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. सांगली पोलिसांकडून या प्रकरणाच्या नि:पक्षपाती चौकशीची अपेक्षा नाही. त्यामुळे हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी आशिष कोरी यांनी याचिकेत केली आहे. अशाच आशयाची आणखी एक याचिका यापूर्वीच उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.