आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Public, Privat Employers Get Paid Leave After 90 Days

राज्यातील सार्वजनिक, खासगी कर्मचा-यांना नव्वद दिवसांनंतर मिळू शकेल पगारी रजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांना ९० दिवसांनंतर पगारी रजा (पेड लीव्ह) घेता येईल. राज्य सरकार तसा प्रस्ताव तयार करत आहे.कामगार मंत्रालयाच्या एका अधिका-यानुसार, सध्याच्या नियमांनुसार २४० दिवस काम केल्यानंतर पगारी रजा घेता येते. ही मुदत ९० दिवस एवढी कमी होईल. म्हणजेच ९० दिवस काम केल्यानंतर कर्मचा-यांना पगारी रजा घेता येईल. त्यासाठी १९४८ च्या कारखाना कायद्यात दुरुस्ती करण्यात येईल.राज्य सरकारने मार्च महिन्यात कामगार कायद्यांत केलेल्या अनेक महत्त्वाच्या बदलाचाच हा एक भाग आहे.

बोजाचा बहाणा नको
अतिरिक्त आर्थिक बोजाचा बहाणा करून नियोक्ता कर्मचा-यांना त्यांच्या पात्र हक्कापासून वंचित देण्यास मनाई करू शकत नाही, असे सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले आहे. राजस्थानच्या सुमारे २५० निवृत्त महाविद्यालयीन शिक्षकांच्या निवृत्तिवेतन प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला.