आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्री साईबाबा समाधी शताब्दीनिमित्त ‘दिव्य मराठी’च्या ‘कॉफी टेबल बुक’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- श्री साईबाबा समाधी शताब्दीनिमित्त दैनिक ‘दिव्य मराठी’तर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सबका मालिक एक’ हे कॉफी टेबल बुक तयार करण्यात आले आहे. त्याचे प्रकाशन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ‘वर्षा’ या निवासस्थानावर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच श्री साईबाबा व शिर्डी परिसरातील नितांत सुंदर छायाचित्रांनी नटलेले हे पुस्तक साईभक्तांसह सर्वांसाठी एक अनोखा ठेवा असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, ‘दिव्य मराठी’चे सीओओ निशित जैन, नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, मॅनेजर स्पेशल इनिशिएटिव्ह वृषाली घाटणेकर, छायाचित्रकार प्रसाद पवार, अमेरिकन ग्लोबल फाउंडेशनचे डॉ. सी.बी. सत्पथी यांच्या वतीने नोएडा साई मंदिराचे देवव्रत सत्पथी, ‘गुडगाव साई का अंगण’चे सौरभ वत्स आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...