आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विमानतळासाठी सहा महिन्यांत सर्व मंजुरी, राज्यमंत्री येरावार यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या येत्या सहा महिन्यांच्या आत घेऊन कामाला सुरुवात केली जाईल. या विमानतळासाठी पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये १८०० हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे सुमारे दीड लाख रोजगार उपलब्ध होणार असून विस्थापितांना योग्य मोबदला दिला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधान परिषदेत दिली. 
 
याप्रकरणी कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचा लक्षवेधी मुद्दा शरद रणपिसे, अनंत गाडगीळ आदींनी उपस्थित केला होता. यास उत्तर देताना येरावार म्हणाले, २०१४-०१५ च्या तुलनेत २०१५-१६ मध्ये विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत २९ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली अाहे. यात भविष्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या निरीक्षणातून व्यक्त केले.  प्राधिकरण आणि राज्य शासनाने गेल्यावर्षी पुणे जिल्ह्यातील कुंभारवळण (मुंजेवाडी), पारगाव मेमाणे (भोसलेवाडी), राजेवाडी, ताम्हणेवाडी, नायगाव (राजुरी-रिसेपिसे) कोलविरे नव्हाळी या सहा ठिकाणी पाहणी केली होती. त्यापैकी मुंजेवाडी - पारगाव मेमाणे (साईट १ ए) या गावातील एक ठिकाण विमानतळ विकासासाठी योग्य असल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदवले. 
 
या ठिकाणचे भूसंपादन, वीज मार्ग आणि रस्तेबदल करण्याबाबत प्राथमिक स्तरावर माहिती देण्यात आली आहे.  याठिकाणी विमानतळ विकसित करायचे झाल्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत याबाबतचा तांित्रक-आर्थिक व पर्यावरणात्मक अहवाल केंद्र सरकारला सादर करावा, असेही प्राधिकरणाने कळवल्याचे येरावार यांनी सांगितले. त्यानुसार विमानतळाचा  ‘आॅब्सटॅक्ल लिमिटेशन सर्व्हे’ अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी लेखी निवेदनात स्पष्ट केले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करणे आणि तांत्रिक-आर्थिक व पर्यावरणात्मक अहवालासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, मिहान इंडिया लि., महाराष्ट्र विमानतळ विकास आणि सिडकोच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती या चर्चेवेळी देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...