आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Cricketer Viraj Mare Name In Genius Book Of World Record.

वडापाव विकणारा क्रिकेटर विराजच्या विश्वविक्रमाची \'गिनीज वर्ल्ड बुक\'मध्ये नोंद!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलग 50 तास 5 मिनिटे आणि 52 सेकंद फलंदाजीची नेट प्रॅक्टिस करणा-या पुण्यातील तरूण क्रिकेटर विराट मरे याने अखेर आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवले आहे.  उजवीकडे पाहा, गिनीज बुक संस्थेकडून मिळालेले सर्टिफिकेट दाखविताना विराज... - Divya Marathi
सलग 50 तास 5 मिनिटे आणि 52 सेकंद फलंदाजीची नेट प्रॅक्टिस करणा-या पुण्यातील तरूण क्रिकेटर विराट मरे याने अखेर आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवले आहे. उजवीकडे पाहा, गिनीज बुक संस्थेकडून मिळालेले सर्टिफिकेट दाखविताना विराज...
पुणे- सलग 50 तास 5 मिनिटे आणि 52 सेकंद फलंदाजीची नेट प्रॅक्टिस करणा-या पुण्यातील तरूण क्रिकेटर विराट मरे याने अखेर आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवले आहे. दोन दिवसापूर्वीच त्याला गिनीज बुक संस्थेकडून सर्टिफिकेट मिळाले आहे. 24 वर्षीय विराज मूळचा लातूरचा असून, आपल्या उदरनिर्वाहासाठी तो वडापावची गाडी व ज्यूस सेंटर चालवत होता. हा विश्वविक्रम नोंदवताना विराजने ब्रिटनमधील दोन क्रिकेटरांचा विक्रम मोडला आहे.

असा केला विश्वविक्रम-


विराज मरे याने गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी पुण्यातील राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्समध्ये सकाळी 9.30 वाजता फलंदाजीचा सराव सुरू केला होता. हा सराव त्याने सलग 50 तासांहून अधिक काळ करीत 24 डिसेंबरला 11 वाजून 35 मिनिटांनी थांबवला. विराजने एकून 50 तास 5 मिनिटे आणि 51 सेकंद सराव केला होता. या सरावादरम्यान विराजने अनेक फास्ट आणि स्पिन बॉलर्सचा सामना केला होता. एवढेच नव्हे तर निरंतर फलंदाजी कायम ठेवण्यासाठी बॉलिंग मशीनचा वापर केला. सलग 48 तास फलंदाजीचा सराव करताच त्याने ब्रिटनच्या खेळाडूचा विक्रम मोडला होता. गिनीज बुकच्या नियमानुसार विराजने प्रत्येक तासाला केवळ 5 मिनिटांचा ब्रेक घेतला होता. विराजने 50 तासांच्या सरावात 2447 ओव्हर्स खेळून काढल्या होत्या, म्हणजेच 14 हजार 682 चेंडूंचा सामना केला होता.

ब्रिटिश खेळाडूंचा विक्रम तोडला-

सलग 48 तास फलंदाजीचा सराव करून विराजने 2 ब्रिटिश क्रिकेटर रिचर्ड वेल्स आणि डेव न्यूमॅन यांचा विक्रम तोडला आहे. या दोघांनी ओव्हल क्रिकेट मैदानात सलग 48 तास 2 सेकंद बॅटिंग करीत सराव केला होता. याआधी 26 तासाचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅल्बी शेल या खेळाडूच्या नावावर होता.

प्रशिक्षक आचरेकरांकडून बारकावे शिकला-

विश्वविक्रम बनविणारा विराज लातूर जिल्ह्यातील एका सामान्य परिवारातील आहे. विराजला क्रिकेटची आवड लहानपणापासूनच होती. हीच आवड त्याला क्रिकेटर सचिन तेंदुलकरचे कोच राहिलेल्या रमाकांत आचरेकर यांच्याकडे घेऊन गेली. मुंबईत आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली विराजने काही महिन्यातच क्रिकेटमधील बारकावे शिकून घेतले. तो जास्त काळ मुंबईत राहू शकला नाही. आर्थिक चणचणीमुळे तो पुण्यात स्थिरावला.

आर्थिक तंगीत विकले वडापाव-


विराज शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे वडिल लातूरमध्ये शेती करतात. पुण्यात आल्यानंतर त्याला राहण्या-खाण्यासाठी वडापाव विकावा लागला. यातून विराजने आपला खर्च भागवला व क्रिकेटचे किट, पुस्तके खरेदी केली. पुण्यात असताना क्रिकेटमधील या विक्रमाची त्याला माहिती मिळाली. तो विक्रम त्याला खुणावू लागला व त्याने सराव सुरु केला. आपला स्टॅमिना व फिटनेस वाढविण्यासाठी विराजने सलग 40 तास क्रिकेट खेळण्याचा सराव केला. मात्र, विश्वविक्रमासाठी त्याला आणखी 8 तासांचा फिटनेस वाढविण्याची गरज होती. यासाठी त्याने योगाभ्यास सुरू केला. गेल्या वर्षी त्याने 46 तास फलंदाजी करीत विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी मेहनत घेतली.

'गिनीज बुक'च्या अधिका-यांना बोलवायला पैसे नव्हते-


48 तास चाललेल्या फलंदाजी सरावादरम्यान गिनीज बुक यांच्याकडून कोणताही अधिकारी पुण्यात उपस्थित नव्हता. विराजने सांगितले की, गिनीज बुकच्या अधिका-यांना येथे बोलावण्यासाठी त्याला 500 डॉलर शुल्क भरावे लागत होते. मात्र, एवढे पैसे नसल्याने ते शक्य झाले नाही. त्यामुळे सलग 48 तासांचा सराव केलेला व्हिडिओ गिनीज बुकवाल्यांकडे पाठवला. त्यानंतर त्याच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला गेला.

चांगल्या प्रशिक्षणाची अपेक्षा-

विराजने सांगितले की, ब्रिटनमधील दोन क्रिकेटर यांनी जेव्हा विश्वविक्रम नोंदवला तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मैदानात उपस्थित होते. आता माझ्या विश्वविक्रमानंतर मला खेळातील चांगल्या सुविधा मिळतील अशी आशा करतो. चांगला प्रशिक्षक मिळावा अशी माझी इच्छा आहे. विराजच्या स्टॅमिन्याची आणि पिचवर अनेक तास सराव करण्याबाबत कोच रमाकांत आचरेकर यांनीही कौतूक केले आहे.

पुढील स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेटर विराज मरेचे काही कारनामे आणि छायाचित्रे....