आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे- MESB च्या इंजिनीयरला 10 हजारांची लाच घेताना अटक, \'DSK\' वर आता PF अपहाराचा गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सुसराेड शाखेतील सहायक अभियंत्यास १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली. केशव पांडुरंग फुलावरे (५२, काेथरूड, पुणे) असे या अधिकाऱ्याचे नाव अाहे.

 

 

तक्रारदार त्यांच्या नातेवाइकांनी सुतारवाडी भागात जागेवर फ्लॅट बांधले अाहेत. फ्लॅटमध्ये विद्युत मीटरची जाेडणी देण्यासाठी फुलवारेने १० हजार रुपयांची मागणी केली. याची तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यावरून सहायक पोलिस अायुक्त जगदीश सातव यांच्या पथकाने सापळा रचून फुलवारेला रंगेहाथ अटक केली. 

 

 

डीएसकेंवर कामगारांच्या पीएफचे पैसे भरल्याचा गुन्हा दाखल 

 

 

डीएसके डेव्हलपर्सच्या कर्मचाऱ्यांचा महिन्यांचा लाख ६७ हजार रुपये भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याचा गुन्हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

 

 

डीएसके यांच्याविराेधात मुदत ठेवीदार, फ्लॅटधारक गुंतवणूकदार अाणि कंपनीतील कर्मचारी यांच्याकडून आधीच तक्रारी सुरू आहेत. यातच पीएफचे प्रकरण पुढे आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...