आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवास पाटलांच्या मुलाला पुण्यातून ‘पदवीधर’चे तिकीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील रिक्त होत असलेल्या पाच जागांची निवडणूक 20 जून रोजी होत आहे. त्यातील पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने सारंग पाटील यांना रविवारी उमेदवारी जाहीर केली. ते शरद पवार यांचे निकटवर्तीय व सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र आहेत.
लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीमुळे राष्ट्रवादीच्या दिग्गज मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला असताना व पक्षाध्यक्ष शरद पवारांनी नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचे सूतोवाच केल्यानंतरही पक्षाने पदवीधरसाठी घराणेशाहीचाच विचार केल्याने कार्यकर्त्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सारंग पाटील अभियंते असून संगणक अभियंत्यांना प्रशिक्षण देणारी पुण्यात त्यांची नामांकीत संस्था आहे. गेली चार वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अवर सचिव म्हणूनही काम करत आहेत. युवा वर्गात त्यांचा चांगला संपर्कही आहे.
पुन्हा घराणेशाही
श्रीनिवास पाटील मूळचे प्रशासकीय अधिकारी. पवारांनी त्यांना राजकारणात आणले. 1999 आणि 2004 मध्ये कराड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर पक्षाने त्यांना सिक्कीमचे राज्यपाल केले. पुणे पदवीधरमधून अरुण लाड, शरद बुट्टे, शैला गोडसे आणि दत्ता पाटील राष्ट्रवादीतर्फे इच्छुक होते. परंतु राष्ट्रवादीने पुन्हा एकदा घराणेशाहीची निवड केली आणि सारंग पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.
दोन सहकार्‍यांना गोळी मारून जवानाची आत्महत्या
जम्मू । जम्मू - काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात रविवारी एका लान्सनायकाने आपले सहकारी जेसीओ व हवालदारावर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली. घटनेनंतर स्वत:वर गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. नियंत्रण रेषेवरील मदान चौकीवर तैनात जवानांमध्ये वाद झाल्याने ही घटना घडली. लष्कराचे प्रवक्ते कर्नल मनीष मेहता यांनी घटनेला दुजोरा दिला असून चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुलपूर भागात मदान चौकीवर तैनात लान्सनायक दर्शन लाल याने जेसीओ चंबल सिंह व हवालदार रजतसिंग यांच्यासोबत वाद झाला. तो इतका विकोपाला गेला की दर्शनने त्याच्या सर्व्हिस रायफलने दोघांवर गोळीबार केला. फायरिंगचा आवाज ऐकून इतर
जवानांना पाककडून गोळीबार झाला असावा असे वाटले. ते चौकीवर पोहोचण्याआधी दर्शनने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली होती.