आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे वर एका रात्रीत चार अपघात; 1 ठार, 4 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार दिवसापूर्वी खोपोली येथे झालेल्या अपघातात 17 जण ठार झाले होते. - Divya Marathi
चार दिवसापूर्वी खोपोली येथे झालेल्या अपघातात 17 जण ठार झाले होते.
पुणे- पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे वर बुधवारी एकाच रात्रीत एकून चार अपघात झाले आहेत. यात एक 16 वर्षीय युवक मृत्यूमुखी पडला आहे तर चार जण जखमी झाले आहेत. पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे वरच्या रोजच होणा-या अपघाताने तेथून प्रवास करणा-यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, या मार्गावर वाढत जाणारे अपघात पाहता सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई-पुणे एक्स्प्रेसची पाहणी करणार आहेत. तसेच अपघात नेमके कोणत्या कारणामुळे होत आहेत याची माहिती घेणार आहेत.

80 पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास आजपासून कारवाई-
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर सर्वाधिक अपघात हे वेगावर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असल्यानेच झाल्याचे आकडेवारी सांगत आहे. या मार्गावर हलकी वाहने 100 ते 120 प्रतितासी वेगाने धावतात. मात्र, या मार्गावरून प्रतिताशी 80 या वेगानेच वाहने चालवली जावीत असे महामार्ग पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, आजपासून 80 पेक्षा अधिक वेगाने वाहन चालवताना आढळल्यास त्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...