आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव : लोगोत फक्त गणपतीचा फोटो ठेवण्याचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे महापालिकेची मुख्य इमारत. - Divya Marathi
पुणे महापालिकेची मुख्य इमारत.
पुणे- गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा फोटो न छापण्याच्या भाऊ रंगारी मंडळाच्या भूमिकेवर महापालिकेने तटस्थ भूमिका घेतली आहे. महापालिकेने लोगोत फक्त गणपतीचा फोटो ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मात्र गणेशोत्सवाच्या जनक वादावरुन भाऊ रंगारी मंडळ आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळांमध्ये वाद सुरु आहे, त्यामुळे पुणे महापालिकेने सावध तटस्थ भूमिका घेतली आहे.
 
तत्पूर्वी भाऊसाहेब रंगारी मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 साली पुण्यात केली. त्यामुळे सार्वजनिक गणेशाेत्सवाचे यंदा 126 वे वर्ष चालू असताना, राज्य शासन व पुणे मनपा यांच्याकडून इतिहासाचा विपर्यास करून, यंदाचे गणेशोत्सवाचे 125 वे वर्ष असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असून लोकमान्य टिळक यांनी त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव प्रचार व प्रसाराचे काम केले आहे. मात्र सरकार हे मान्य करत नाही, ही खेदाची बाब आहे, अशी भूमिका मांडली होती.
बातम्या आणखी आहेत...