आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी हॅकर्सकडून पुणे वाहतूक पोलिसांचे संकेतस्थळ हॅक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडातील आरोपींना शोधण्यात दमछाक झालेल्या पुणे पोलिसांपुढील अडचणीत आणखीच भर पडली आहे. पाकिस्तानी हॅकर्सने पुणे वाहतूक पोलिसांचे संकेतस्थळ हॅक केल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

एका पोलिस अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, पुणे वाहतूक पोलिसांचे संकेतस्थळ हे पाकिस्तातून 14 ऑगस्ट रोजी हॅक झाले. त्यांनी डाटा डिलीट न करता केवळ होमपेजला बाधा पोहोचवली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास सायबर गुन्हे विभाग कसोशीने करत आहेत. तसेच माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानेदेखील ही बाब गांभीर्याने घेतली आहे. याबाबत वाहतूक पोलिसांतील वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच सायबर गुन्हे विभागाचे डॉ. संजय तुंगार यांनीही या मुद्यावर बोलण्यास नकार दिला.

‘आम्हाला तर काहीच माहिती नाही’
आम्ही वाहतूकीबाबतची दररोजची माहिती संकेतस्थळावर अपलोड करत आहोत. परदेशातून संकेतस्थळ हॅक झाल्याबाबत काहीही माहिती नाही. तसेच सध्या संकेतस्थळ व्यवस्थित सुरू आहे, अशी माहिती पुण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी (प्रशासन) आर. कमिरे यांनी दिली.