आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-सातारा महामार्गावर कारला अपघात, मुंबईचे 3 युवक ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे-सातारा महामार्गावर आज सकाळी खेड शिवापूर येथे एका कारला झालेल्या अपघातात मुंबईतील युवकांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
चिनार राऊत, आयुष आणि अद्याक काटोर अशी मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. तर आणखी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पुण्यातील ससून रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जण मित्र असून ते मुंबईहून महाबळेश्वरकडे चालले होते. ट्रेकिंग करण्यासाठी हे आज पुणे-सातारा महामार्गावरून जात असताना खेड शिवापूर येथे एका टॅंकरने त्याला मागून जोराची धडक दिली. यात ही कार समोरील रस्त्याच्या कडेला जोरात आदळली व पटली होत गेली. यात वरील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे पावनेसहाच्या सुमारास झाला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
अपघाताने वाहतुकीचा खोळंबा-
अपघात झाल्याने या महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. दुपारी 12 वाजेपर्यंत महामार्गावर वाहनेच वाहने दिसत होती. सर्व वाहणे गोगल गायीच्या गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला.
बातम्या आणखी आहेत...