मुंबई - मेडिकल व तत्सम अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे (डीएमईआर) जाहीर झाला. राज्याचा निकाल २० टक्के लागला असून, मुलींनी बाजी मारली आहे. पुण्याची हर्षिता शेट्टी २०० पैकी १९९ गुण घेत राज्यात प्रथम आली आहे. नागपूरचा अमित दासगुप्ता १९९ गुणांसह दुसरा, तर अकोल्याचा अर्पित जयपुरी १९७ गुणांसह तिस-या स्थानी राहिला. निकालात मुलींचा टक्का २२.८९ आहे. विदर्भ २७.४, तर मराठवाड्याचा निकाल २०.८ टक्के राहिला. निगेटिव्ह मार्किंग रद्द केल्याचा चांगला परिणाम निकालात दिसून आला. ७ मे रोजी ही सीईटी झाली होती.