आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबईत सगळ्यात महागड्या व सोन्याच्या गणपतीची प्रतिष्ठापना!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: भांडूप येथील मॅगनेट मॉलमध्ये ठेवलेली प्युअर सोन्याच्या गणपतीची मूर्ती)

मुंबई- महाराष्ट्रासह देशभर आजपासून गणेशोत्सवाची सुरुवात धुमधडाक्यात झाली आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान बाप्पाचे अनेक रंग आपल्याला पाहायला मिळतात. गणेशभक्त वेगवेगळ्या छातुंचे, विविध प्रकारच्या मातींचे आणि वेगवेगळ्या आकारांसह अनेक रंगातील गणेशाची मूर्ती खरेदी करतात व आपापल्या घरात बसवितात. मुंबईतील भांडूपमधील मॅगनेट मॉलमध्ये देशातील सर्वात महागडी व फक्त सोन्याची मूर्ती ठेवली आहे. 5 फूट उंचीची ही गणेश मूर्ती फक्त सोन्यापासून बनविलेली आहे.

24 कॅरेट सोन्यापासून बनविलेली ही गणेश मूर्ती थायलंडमध्ये तयार केली आहे. ही गणेश मूर्ती बनविण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. मॅगनेट मॉलने मेन गेटवरच लोकांच्या दर्शनासाठी एका काचेच्या बड्या भांड्यात ही मूर्ती ठेवली आहे. या मूर्तीची किंमत 16 लाख रूपये असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याची ही गणेश मूर्ती दोन सप्टेंबरपर्यंत मुंबईकर लोक पाहू शकतात. पाच दिवसासाठी प्राणप्रतिष्ठा केलेल्या या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन न करता लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे.

सोन्याच्या या गणेश मूर्तीच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. मॉलच्या आत-बाहेर 10 सुरक्षारक्षक 24 तास या मूर्तीवर लक्ष ठेवून असतील.
पुढे पाहा, सोन्याने बनवलेल्या गणेश मूर्तीचे आणखी काही छायाचित्रे...