आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PWD Ex Chief Secretory Shamalkumar Mukherjee Issue In Maharashtra

मालेगावाच्या तरुणांना नोकऱ्यांचे आमिष; 18 कोटी रुपयांचा चुना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मालेगाव शहर तसेच परिसरातील १२० तरूणांना सार्वजनिक बांधकाम िवभागात बाेगस नोकरी देऊन त्यांच्याकडून तब्बल १८ कोटी रूपयांची लुट केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम िवभागाच्या वेब मॅनेजमेंट कंपनीमध्ये २०११ या तरूणांना िनयुक्त करण्यात आले होते. नोकरी िदलेल्या १२० तरूणांना १२ ते ४५ हजार रुपयापर्यंत पगार िमळत होते. मात्र मे २०१५ मध्ये पगार बंद झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरूणांच्या लक्षात आले. सार्वजनिक बांधकाम िवभागाचे माजी प्रधानसचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे पैसे घेतल्याचा आरोप फसवणूक झालेल्या तरूणांनी केला आहे.

धुळ्याचे खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी मंत्रालयात येऊन या तरूणांच्या फसवणुकीची व्यथा मांडली. शेती, घरे िवकून तरूणांनी नोकरीसाठी पैसे िदले होते. िवशेष म्हणजे श्यामलकुमार यांच्या मध्यस्तीने बोगस नोकऱ्या निर्माण करणारे एक रॅकेट यामध्ये गुंतले असल्याचे फसवणूक झालेल्या भूषण शेवाळे यांनी सांिगतले. सुरूवातीला या तरूणांना काहीच काम नव्हते. मात्र नंतर माहितीच्या अधिकाराचे काम त्यांना देण्यात आले. याशिवाय २०१४च्या िनवडणुकांचे कामही या तरूणांना िमळाले होते.

सार्वजनिक बांधकाम िवभागाचे िनवृत्त मुख्य अभियंता सुभाष पंचगले उपअधिक्षक वानखेडे हे मुखर्जी यांच्याबरोबर या फसवणुकीत सहभागी असल्याचा आरोप शेवाळे तसेच शेखर बागुल यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम िवभागातील एम.एन. डेकाटे यांच्या सहीनिशी आपल्याला नियुक्ती पत्र देण्यात आल्याचे बागुलने सांिगतले. डेकाटे हे सध्या पोलिस गृहनिर्माण िवभागात कार्यरत आहे. मुखर्जी यांच्याप्रमाणे डेकाटे तसेच पंचगले यांचाही या फसवणुकीत हात असून हे दोघेजणही तत्कालिन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात काम करत होते. त्यावेळी मालेगाव हब काॅम्पेक्स, पहिला माळा, मालेगाव कोर्ट, नाशिक येथे सार्वजनिक बांधकाम िवभाग वेब मॅनेजमेंटचे कार्यालय स्थापन करण्यात आले होते. िवशेष म्हणजे सुभाष शेवाळे यांचे नातेवाईक असलेल्या ललित शेवाळे यांनी कार्यालयासाठी जमीन िदली होती आणि इमारत उभारण्यासाठी मुखर्जी यांनी पैसे िदले होते, असे भूषण शेवाळेने सांिगतले.

बोगस कंपनीत नोकरी देण्यात आलेल्या तरूणांना पैसे देण्यासाठी मंत्रालयाजवळ बोलावण्यात आले होते. मंत्रालयाच्या बाहेर येऊ श्यामलकुमार मुखर्जी यांच्याशी संबंिधत असलेल्या व्यक्तींनी तरूणांकडून पैसे घेतले, असे फसवणूक झालेल्या शेखर बागूलने सांिगतले. िवशेष म्हणजे तरूणांना पॅन कार्ड, फाॅर्म १६ पगाराची स्लिपही देण्यात येत होती.

सीआयडी चौकशीची मागणी
मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणी आपण सीआयडी चौकशीची मागणी करणार आहोत. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सरकारच्या एका िवभागातील अिधकारी, कर्मचारी ठरवून ही फसवणूक केल्याचे िदसून येेते, असे खासदार भामरे यांनी सांिगतले.

मुखर्जींच्या घरी जाऊन आत्महत्या करणार : शेवाळे
याप्रकाराने आमचे आयुष्य उदध्वस्त झाले आहे. आमच्या घरच्यांनी आपली सारी कमाई िवकून नाेकरीसाठी पैसे िदले होते. पण, आज आमच्या पदरी फसवणूक आली आहे. श्यामलकुमार मुखर्जी यांनी नोटरी करून तुमचे पैसे परत देतो, असे आश्वासन िदले असले तरी ती नोटरीही बोगस असल्याचे िदसून आले आहे. यामुळे मुखर्जी यांनी आपले पैसे परत िदले नाही तर त्यांच्या नागपूरच्या घरी जाऊन तेथे मी आत्महत्या करेन, अशी धमकी भूषण शेवाळे यांनी दिली अाहे.