आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चाला पाकिस्तानातूनही पाठिंबा; फेसबूक पेजवर झळकली समर्थनाची पोस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वदेरा दिन मोहम्मद मराठा बुगटी प्रमुख, ‘मराठा कौमी इतेहाद’ - Divya Marathi
वदेरा दिन मोहम्मद मराठा बुगटी प्रमुख, ‘मराठा कौमी इतेहाद’
औरंगाबाद/मुंबई- बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या ‘मराठा कौमी इतेहाद’ या संघटनेने मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण द्यावं, अशी मागणी ‘मराठा कौमी इतेहाद’ने केली आहे. ‘मराठा ट्राईब’ या फेसबुक पेजवर याबाबतची पोस्ट टाकण्यात आली आहे. 
 
मराठा कौमी इतेहाद भारतातील मराठा मोर्चाला पूर्ण पाठिंबा देत आहे. मराठा समाजावर अन्याय होत आहे, त्याचा मी निषेध करतो. मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळायलाच हवं. तो त्यांचा राष्ट्रीय हक्क आहे. त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सहभागी आहोत. पाकिस्तानातील मराठ्यांना न्याय मिळतो, मग भारतातील मराठ्यांना का नाही?  पाकिस्तानातील मराठा समाज याचा तीव्र निषेध करतो, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, मराठी क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईला सर्व शाळांना दुपारनंतर सुट्टी देण्यात आली आहे. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर डबेवालेही सुट्टीवर गेले आहेत.
 
हेही वाचा
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...