Home | Maharashtra | Mumbai | question rises on police role in heena murder case

शीनाला होती मृत्‍यूची भीती; इंद्राणी देत होती स्‍लो पॉयजन; मित्रांचा खुलासा

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Aug 30, 2015, 02:02 PM IST

हाय प्रोफाइल शीना बोरा हत्‍याकांडामध्‍ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. दरम्‍यान, तीन वर्षांपूर्वी अर्धवट जळालेल्‍या अवस्‍थेत शीनाचा मृतदेह सापडूनसुद्धा रायगड पोलिसांनी खुनाचा गुन्‍हा का दाखल केला नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला

 • question rises on police role in heena murder case
  शीनाला घेऊन जाताना पोलिस.

  मुंबई - हाय प्रोफाइल शीना बोरा मर्डर केसमध्‍ये आणखी एक नवा खुलासा समोर आला असून, मृत्‍यूच्‍या काही दिवसांपूर्वी आपल्‍या जिवाला धोका असल्‍याची भीती शीना हिने मैत्रिणीजवळ व्‍यक्‍त केली होती. यासाठी तिच्‍यावर स्‍लो पॉयजनचा प्रयोग झाल्‍याचेही तिने मैत्रिणीला सांगितले होते. शिवाय तिने केलेल्‍या वैद्यकीय चाचणीमध्‍येही स्‍लो पॉयजन आढळून आल्‍याचे तिच्‍या मैत्रिणीने सांगितले.
  दोन महिन्‍यापर्यंत चालला उपचार
  शीनाच्‍या मैत्रिणीने सांगितले, वर्ष 2012 च्‍या सुरुवातीला शीना ही वारंवार आजारी पडायला लागली. त्‍यामुळे आपल्‍याला स्‍लो पॉयजन दिले जात असावे, अशी शंका तिला आली. त्‍यानंतर केलेल्‍या वैद्यकीय चाचणीमध्‍ये तिला स्‍लो पॉयजन दिले जात असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. पुढे ती दोन महिने दिल्‍लीत थांबली आणि त्‍या ठिकाणी तिथे तिने उपचार घेतले. नंतर ती गुवाहाटीला परतली. त्‍या ठिकाणी काही दिवस ती आजी-आजोबा आणि भावासोबत राहिली. शीना आणि मिखाइल हे दोघेही आपली आई इंद्राणीला प्रचंड घाबरत असत. त्‍यामुळेच शीना बेपत्‍ता झाल्‍यानंतरही तिच्‍या बद्दल मिखाइलने काहीही विचारले नाही.
  प्रकरणातील ताज्‍या घडामोडी
  > ज्‍या कारमध्‍ये शीनाचा खून झाला ती कार पोलिसांनी जप्‍त केली.
  >2012 मध्‍ये शीनाचा मृतदेह आढळूनही रायगड पोलिसांनी गुन्‍हा का नोंदवला नाही, याच्‍या चौकशीचे आदेश. एका नेत्‍याच्‍या सांगण्‍यावरून प्रकरण दाबल्‍या गेल्‍याची चर्चा
  >मिखाइल बोराने पोलिसांना सांगितले की, इंद्राणीने त्‍यालाही ठार मारण्‍याचा प्‍लॅन केला होता. पण, तो पळून जाण्‍यास यशस्‍वी ठरला.
  >सूत्रांनानुसार, इंद्राणीचा पहिला नवरा आरोपी संजीव खन्ना यांनीही मिखाइलच्‍या दाव्‍याची पुष्‍टी केली.
  >इंद्राणीने मिखाइलवर पैसे हडप करण्‍याचा आरोप केला.
  > 24 एप्रिल 2012 ला संजीव खन्ना, इंद्राणी मुखर्जी आणि ड्राइवर श्यामबीर राय यांनी बांद्रा परिसरातून शीनाचे अपहरण केले आणि पाण्‍यात ड्रग्स देऊन बेशुद्ध केले. नंतर गळा घोटून तिचा खून केला. या तिघांच्‍या कॉल रेकॉर्डची तपासणी होत आहे.
  >पोलिसाने शीनाचा बॉयफ्रेंड राहुल मुखर्जीला विचारले की, शीना बेपत्‍ता झाल्‍यानंतर त्‍याने तिला शोधण्‍याचा प्रयत्‍न का केला नाही. त्‍यावर म्‍हणाला, या बाबत आपण चौकशी केली होती. पण इंद्राणीने सांगितले की, ती अमेरिकेला गेली आहे. आपण तिच्‍या बोलण्‍यावर विश्‍वास ठेवला.
  प्रकरण दाबण्‍याचा प्रयत्‍न ?
  रायगड - तीन वर्षांपूर्वी अर्धवट जळालेल्‍या अवस्‍थेत शीनाचा मृतदेह सापडूनसुद्धा रायगड पोलिसांनी खुनाचा गुन्‍हा का दाखल केला नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला असून, हे प्रकरण दाबण्‍याचा प्रयत्‍न केला गेल्‍याची शंकाही व्‍यक्‍त केली जात आहे. दरम्‍यान, महाराष्ट्रचे डीजीपी यांनी या प्रकरणी रायगड पोलिसांची चौकशी करण्‍याचे आदेश दिले आहेत.
  आरोपींना नेले घटनास्‍थळावर
  ज्‍या ठिकाणी शीना हिच्‍या मृतदेहाची विल्‍हेवाट लावली त्‍या ठिकाणी पोलिसांनी इंद्राणी, तिचा ड्राइवर आणि संजीव खन्ना नेले होते. शिवाय ज्‍या हॉटेलमध्‍ये शीनाच्‍या हत्‍येचा कट रचला त्‍या हॉटेलमध्‍ये राहुल मुखर्जी आणि मिखाइल बोरा यांना समोरा-समोर बसवून हत्‍येसंबंधी प्रश्‍न विचारत आहेत.
  का पडलेत प्रश्‍न?
  * 23 मे 2012 रोजी रायगडच्‍या पेण तालुक्‍यातील जंगलामध्‍ये शीनाचा अर्धवट जळालेला मृतदेहाचे अवशेष आढळले होते. पण, पोलिसांनी केवळ सांगडा सापडल्‍याची नोंद करून तपास थांबवला.
  * या प्रकरणी रायगड साधा आकस्मिक मृत्‍यूचा गुन्‍हाही नोंदवला नाही.
  * पोलिसांनी दावर केला की, पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. पण, कुणाच्‍या विरोधात एफआयआर नोंदवण्‍याचा प्रयत्‍न केला गेला नाही.
  * सांगडा आढळल्‍यानंतर अनेक लोकांचे बयाण नोंदवण्‍यात आले होते. पण, गुन्‍हा नोंदवण्‍यात आला नसल्‍याचा खुलासा रायगडचे एसपी सुवेज हक यांनी केला.
  * गुन्‍हा का दाखल केला गेला नव्‍हता, हे रायगड पोलिस अधीक्षक पत्रकार परिषदेमध्‍ये सांगू शकले नाहीत.
  डीजीपीने दिले चौकशीचे आदेश
  सापळा आढळला तेव्‍हा रायगड पोलिसांनी गुन्‍हा का दाखल केला नाही, याच्‍या चौकशीचे आदेश महाराष्‍ट्राचे डीजीपी संजीव दयाल यांनी दिले. दयाल म्‍हणाले, “24 एप्रिल 2012 रोजी रायगड जिल्‍ह्यात पोलिसांना शीनाचा मृतदेह आढळला होता. त्‍याला तपासणीसाठी जे. जे. रुग्‍णलयात पाठवले. पण, रायगड पोलिसांनी चौकशीकडे दुर्लक्ष केले.

 • question rises on police role in heena murder case
  इंद्राणीला घेऊन जाताना पोलिस.
 • question rises on police role in heena murder case
  मृतदेहाचे अवशेष शोधण्‍यासाठी जंगलात केलेले खोदकाम.
 • question rises on police role in heena murder case
  मृतदेहाचे अवशेष शोधण्‍यासाठी जात असलेली टीम
 • question rises on police role in heena murder case
  इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी.
 • question rises on police role in heena murder case
  शीना मुखर्जी
 • question rises on police role in heena murder case
  पीटर आणि इंद्राणी - फाइल फोटो
 • question rises on police role in heena murder case
  इंद्राणी, तिचे सावत्र वडील आणि शीना.
 • question rises on police role in heena murder case
  इंद्राणी आणि शीना.

Trending