आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर.आर. पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कर्करोगाने ग्रस्त राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर. पाटील यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किमोथेरेपीला ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे रुग्णालयाने म्हटले.

रुग्णालयाच्या पत्रकानुसार पाटील यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचे कारण नाही. त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. त्यांना रेडिएशन देण्यात आले असून आता किमोथेरेपी सुरू आहे. ते या उपचारांना योग्य प्रतिसादही देत आहेत. ५७ वर्षीय पाटील यांच्यावर काही दिवसांपासून वांद्रे रुग्णालयात उपचार सुरू होते. तथापि, त्याबाबत गुप्तता पाळण्यात आल्याने त्यांच्या प्रकृती व झालेल्या आजाराबाबत शंका-कुशंकांना ऊत आला होता.