आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आबांचा पहिला स्मृतिदिन: शरद पवारांनी जागवल्या अंजनीपुत्राच्या आठवणी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर. आर. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी तासगाव तालुक्यातील अंजनी या त्यांच्या गावी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी आदरांजली वाहिली. - Divya Marathi
आर. आर. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी तासगाव तालुक्यातील अंजनी या त्यांच्या गावी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी आदरांजली वाहिली.
सांगली- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी तासगाव तालुक्यातील अंजनी या त्यांच्या गावी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी शरद पवार, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह नारायण राणे, दिपक केसरकर, वसंत डावखरे, आबांच्या पत्नी सुमनताई पाटील, निरंजन डावखरे, विश्वजीत कदम, चित्रा वाघ, प्रतिक पाटील, प्रकाश गजभिये, सुरेश धस, प्रमोद पाटील उपस्थित होते.
यावेळी शरद पवार, सुनिल तटकरे, नारायण राणे यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार म्हणाले, काही माणसे अशी असतात की त्यांच्या कर्तृत्वाने, वागण्याने, समाजाच्या उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टाने, सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्यामध्ये कसे राहावे याचा ते आदर्श ठरतात. या सगळ्यांमध्ये आर. आर. हे बसणारे आहेत.
वर्षातला एकही दिवस, दिवसातला एकही तास, एकही क्षण आबांच्या आठवणीशिवाय गेला नाही. कर्तृत्ववान नेतृत्व किती मोठ्या प्रमाणावर आपली प्रतिमा निर्माण करू शकते हे आबांच्या रूपाने महाराष्ट्राने अनुभवले,' अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आपल्या भावना मांडल्या.
'आबांनी दाखवलेल्या मार्गाने शिस्तबद्धरीत्या पुढे जात त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करुया. आबांचा जवळचा मित्र तसेच सहकारी या नात्याने मी ही सर्व कामे पूर्णत्वाला नेण्याकरता सर्वांच्या साथीने प्रयत्नशील राहीन असे प्रतिपादन अजित पवार यांनी आबा यांच्या आठवणींना उजाळा देताना केले.
पुढे सविस्तर वाचा, शरद पवारांनी आबांविषयी जागवलेल्या आठवणी....