आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापूंच्या कार्यक्रमांना होळीपर्यंत बंदी- आर. आर. पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- होळी होईपर्यंत आसाराम बापू यांना महाराष्ट्रात कुठेही कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिली. दरम्यान, नवी मुंबईत पत्रकारांवर हल्ला करणा-या बापूंच्या 23 अनुयायांना मंगळवारी अटक करण्यात आली.

राज्यात दुष्काळी स्थिती असतानाही आसाराम बापू यांनी नाशिक, नागपूरपाठोपाठ नवी मुंबईतील सत्संगात रंगपंचमी साजरी करून हजारो लिटर पाण्याची नासाडी केल्याचे वृत्त इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमध्ये झळकले होते. या प्रकारामुळे संतापलेल्या बापूंच्या अनुयायांनी सोमवारी नवी मुंबईतील सत्संग कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यास जमलेल्या पत्रकार व कॅमेरामनवर हल्ला चढविला होता, यात कॅमेरा व इतर साहित्याचे नुकसान झाले होते. या प्रकरणी पत्रकारांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फुटेची पाहणी करून 23 जणांना अटक केली आहे.

दरम्यान, हल्ल्याचा निषेध करत कारवाईसाठी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांच्या भावना लक्षात घेऊन पाटील यांनी बापूंच्या कार्यक्रमावर होळी होईपर्यंत बंदी घालण्याचे आश्वासन दिले.