आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरा-घरात पोलिस दिले तरी बलात्कार रोखणे अशक्य- आर आर पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- समाजातील सर्वच स्तरात नैतिकता मोठ्या प्रमाणात घरसली आहे त्यामुळेच बलात्कारात वाढ झाली आहे. प्रत्येक घरा-घरात जरी पोलिस दिले तरी महिलांवरील बलात्कार रोखणे अशक्य आहे, असे वादग्रस्त वक्तव्य गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितले. दरम्यान, याबाबत माध्यमांनी वृत्त देताच पाटील यांनी घुमजाव केले व आपण तसे बोललो नसल्याचे सांगितले.
विधान परिषदेत राज्यातील महिलांवरील मागील काही काळात वाढलेल्या अत्याचाराबाबत विरोधी पक्षांनी आवाज उठविला. यावेळी बोलताना गृहमंत्री पाटील यांनी सांगितले की, नैतिक पातळीवर समाजात बरीच घसरण झाली आहे. जाहिराती, अश्लील चित्रे, दृश्ये यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी तब्बल 42 टक्के बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींकडून होतात. 40 टक्के बलात्कार हे लग्नाचे आमिष दाखवून होतात. 6 टक्के बलात्कार हे घरातील नातेवाईकांकडून झाल्याचे आकडेवारी सांगते. तरीही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बलात्काराचे प्रमाण कमी आहे. उत्तर प्रदेशात सर्वात जास्त बलात्कार होतात.
दरम्यान, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व सोनसाखळ्यांची चोरी रोखण्यासाठी 200 दुचाकी महिलांचे कमांडो पथके बनविली जातील. महिलांच्या सुरक्षिततेसाठी 500 वाहने खरेदी केली जातील. त्या वाहनांत प्रत्येकी एक महिला अधिकारी असेल. महिलांवर झालेल्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी व तिला कायदेशीर न्याय मिळावा यासाठी हवा तो वकील दिला जाईल असेही पाटील यांनी सांगितले. चंद्रपूर, नांदेड, भंडारा येथील फास्टट्रॅक कोर्टात लवकरच न्यायाधिशांची नेमणूक केली जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले.
दरम्यान, विधान परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर माध्यमांनी आबांवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना घुमजाव करीत आपण विधान परिषदेतत असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे सांगितले. महिलांची सुरक्षा यालाच आपला गृहविभाग प्राथमिकता देणार असल्याचे आबांनी यावेळी सांगितले.