आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसकोर्सवर थीमपार्क हे 'मुंगेरीलाल के सपने'; सचिन सावंत यांची टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्याची शिवसेनेची मागणी म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, अशी टीका करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ही संकल्पना हास्यास्पद ठरवली. रेसकोर्सची लीज वाढवायची की नाही हा निर्णय अद्याप राज्य सरकारने घेतला नसताना शिवसेनेने थीमपार्कचा संपूर्ण आराखडा तयार करून त्यासाठी मुख्यमंत्री व महाराष्ट्राला भावनिक आवाहन करणे म्हणजे लग्नाचा पत्ता नाही आणि बारशाची घाई केल्यासारखे आहे, असे सावंत म्हणाले.

रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क उभारण्याची घोषणा करणाºया शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मुंबई पालिकेने आतापर्यंत त्यांच्या ताब्यात असलेल्या किती जागांवर कोणकोणते आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभारले याबाबत शिवसेनेने आत्मचिंतन केले असते तर बरे झाले असते, असे सावंत म्हणाले. मुंबईला आंतरराष्ट्रीय चेहरा देण्याबाबत शिवसेनेची आजवरची कामगरी शून्य असल्याने त्यांना रेसकोर्सवर खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारायचे आहे की वाद उभा करून भावनांचे राजकारण करायचे आहे, असा सवाल त्यांनी केला.

भावनिक राजकारण : शिवसेनेचा इतिहास फक्त आश्वासने आणि स्वप्ने दाखवण्याचा आहे. युती सरकारच्या काळात दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. शब्दांचा व भावनांचा खेळ करून स्वप्नांचा बाजार मांडण्याशिवाय कोणतेच कर्तृत्व दाखवले नाही. केवळ भावनेवर राजकारण करत राहायचे, अशी टीका त्यांनी केली.