आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याला पाणी सोडण्याविरोधात नाशकात उद्रेक, महा\'जन\' घेरावानंतर राडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या असंतोषाचा उद्रेक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. संतप्त शेतकऱ्यांनी थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांचीच गाडी अडवत घेराव घातला. परिणामी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत, शेतकऱ्यांवर तसेच आंदोलक लोकप्रतिनिधींवर चाल केल्यामुळे चांगलाच राडा झाला. हा गोंधळ शमल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी जलसंपत्ती प्राधिकरणाकडे पुन्हा पाठपुरावा करून पाणी आरक्षणासंदर्भातील चुका दुरुस्त करण्यात येतील असे सांगून आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
दिवाळीपूर्वी मराठवाड्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले होते. या वेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही भाजप सरकारने दखल घेतली नव्हती. न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून पाणी सोडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. त्यावेळी पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्यासारख्या घोषणाही झाल्या होत्या. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पालकमंत्री प्रथमच नाशिकमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त दाखल होणार असल्यामुळे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जोरदार जमवाजमव केली होती. बैठकीनंतर पाणी अारक्षणावर निर्णय असल्यामुळे शेतकऱ्यांचेही लक्ष बैठकीकडे हाेते. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप अाले हाेते. गाड्याच्या गाड्या भरून शेतकरी दाखल हाेत हाेते. शेतकऱ्यांकडून अाक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता गृहीत धरून पाेलिस अायुक्त जगन्नाथन यांच्यासह माेठा फाैजफाटा तैनात हाेता. साधारण वाजेच्या सुमारास पालकमंत्र्यांचा ताफा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जाेरदार घाेषणाबाजी सुरू केली. 'पालकमंत्री हाय हाय, पालकमंत्री परत जा' अशा घाेषणांनी जाेरदार शक्तिप्रदर्शन करण्यात अाले. शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या गाडीकडे धाव घेतल्यावर पाेलिसांची धावपळ उडाली. नेत्यांना अावरण्यासाठी पाेलिसांना बळाचा वापर करावा लागला. दुसरीकडून शेतकऱ्यांनीही हल्लाबाेल केल्यावर पाेलिसांना लाठ्या-काठ्यांचा वापर करावा लागला. दरम्यान, गाडी अडवली गेल्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वत: उतरून शेतकऱ्यांकडे धाव घेतली. या वेळी जाेरदार शाब्दिक चकमकही उडाली.

शेतकऱ्यांबराेबर पत्रकारांनाही मारहाण

पालकमंत्र्यांचीगाडी अडवण्यासाठी लाेकप्रतिनिधी शेतकऱ्यांनी धाव घेतल्यानंतर पाेलिसांनी बळाचा वापर सुरू केला. यात ज्येष्ठ पत्रकार महेंद्र महाजन यांना पाेलिसांकडून मारहाण झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. दरम्यान, पाेलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी अाेळख असूनही जाणीवपूर्वक मारहाण केल्याचा अाराेप त्यांनी केला. त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्रकार संघ तसेच अन्य माध्यम प्रतिनिधींनी तक्रार केल्यानंतर तत्काळ याप्रकरणाची चाैकशी करण्याचे पाेलिस अायुक्तांना सांगत दाेषी अधिकाऱ्यांविराेधात कठाेर कारवाईचे अाश्वासन त्यांनी दिले. पाेलिसांनी जाणीवपूर्वक मारहाण का केली याचाही शाेध घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी पाणीप्रश्नाबाबत योग्य भूमिका मांडण्याचा आग्रह शेतकऱ्यांनी धरला होता. मात्र, पालकमंत्र्यांनी नियोजित दौऱ्यानुसार प्रथम प्राधान्य बैठकीला दिल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. दुसरीकडे बैठक सुरू झाल्यामुळे असंतोष वाढत गेला. अखेर पालकमंत्र्यांना बाहेर येण्यासाठी दहा मिनिटांचा अवधी देण्यात आला, मात्र त्यास दाद दिली गेली नाही. अखेर शेतकऱ्यांनी दरवाजा तोडून सभागृहात येण्याचा इशारा दिल्यावर पालकमंत्री बॅकफूटवर आले. शेतकऱ्यांना समजावण्यासाठी सहकारमंत्री भुसे यांच्यासह ते सभागृहाबाहेर आले. या वेळी भविष्यात गंगापूर धरणातून पाण्याचा एकही थेंब शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय सोडणार नाही असे त्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात पाण्यासंदर्भात काटेकोर नियोजन जाहीर केले जाईल अशीही ग्वाही त्यांनी दिली.
आंदोलकांचा रोष वाढल्याने पायी गाठले बैठकीचे स्थळ-

गाडी अडवून आंदोलकांनी पालकमंत्र्यांना जाब विचारण्याचा केला असता, पोलिसांनी आंदोलकांवर पोलिस बळाचा वापर करत, त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांचा रोष बघता पालकमंत्री महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी गाडीच्या खाली उतरून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही आंदोलकांचा रोष वाढतच राहिल्याने महाजन आणि भुसे यांनी पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, पाणीवाटप कृती समितीचे पदाधिकारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दाखल झाले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे फडकावत 'पालकमंत्री चले जाव, पाणी आमच्या हक्काचे.. नाही कुणाच्या बापाचे' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. पालकमंत्री येण्याची वाट पाहत बसलेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या करत काही काळ 'रास्ता रोको' केला.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमांतून, नाशकातील राडा...