आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhakrishna Vikhe Patil Dig On Devendra Fadanvis Government

फडणवीस सरकारवर बिल्डर लॉबीचा दबाव : विखे पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारने मुंबईत आठचा सरसकट एफएसआय देत बिल्डरधार्जिणे धोरण अवलंबले आहे. सामान्य लोकांना देशोधडीला लावण्याचा हा प्रकार आहे. या सरकारवर बिल्डर लॉबीचा दबाव असल्याचे यातून स्पष्ट होते, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी केला.

शेतकर्‍यांना जाहीर केलेली मदत, धनगर, मुस्लिम, मराठा आरक्षण, सावकाराचे कर्ज माफ करण्याची घोषणा, एलबीटी रद्द करण्याचे धोरण या सर्वच बाबतींत या सरकारने घूमजाव केले. भूसंपादन कायदा केंद्रात मंजूर होण्याआधीच सरकारने अधिसूचना काढून गोंधळ घातला. हा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, अशी टीका विखेंनी केली.

टोल मालकांना कोर्टात जाण्यास वेळ : मुंडे
१२ टोलनाके पूर्ण बंद करण्याची घोषणा सरकारने केली असली, तरी हा निर्णय लगेचच अंमलात आणलेला नाही. त्यामुळे टोल मालकांना या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्यास वेळ दिला आहे का, अशी शंका उपस्थित होते, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लगावला.