आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्तांची वीज तोडू नका : पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज न तोडण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत. तरीही कुठे वीज तोडण्याचे प्रकार घडत असल्यास सुधारित आदेश काढण्यात येतील, अशी माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी विधानतरिषदेत दिली.

अँड. जयदेव गायकवाड, अनिल भोसले, जयंत जाधव या सदस्यांनी शनिवारी गारपीटीच्या आगाऊ सूचनेबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना विखे-पाटील म्हणाले, गारपीट आणि अवकाळी पावसाच्या 42 लाख शेतकर्‍यांना शासनाने आगाऊ सूचना दिली होती. तसेच एफ रेडिओद्वारे शेतकर्‍यांना सावध केले होते, परंतु पिके काढणीच्या अवस्थेत आली असल्याने नुकसान वाचवता आले नाही.

फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने 20.57 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे 50% पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाने 2 हजार 810 कोटी इतका निधी शासनाने मंजूर केला असून त्याच्या वाटपाची कार्यवाही चालू आहे, अशी माहिती विखे-पाटील यांनी दिली. शासनाने दवंडी पुन्हा सुरू करावी, अशी सूचना नीलम गोर्‍हे यांनी केली.