आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे मांला वडील म्हणायचे, गुडिया... पतीचे होते मिठाईचे दुकान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राधे मां सध्या आलिशान आयुष्य जगत आहे. मुंबईतील थाटबाट, जॅग्वॉर-ऑडी सारख्या लग्झरी कार, विमानाने प्रवास, विदेशी दौरे, मोठमोठे आयोजन, कोट्यवधी रुपये आणि अब्जाधिश भक्तगण. पण कधीकाळी राधे मांने फार हलाखीचे आयुक्त व्यतीत केले. तिचे वडील तिला गुडिया म्हणायचे. लहानपण फार गरिबीत गेले. लग्नही एक गरीब व्यक्तीशी झाले. तिचा पती गावात मिठाईचे दुकान चालवायचा.
वडील म्हणायचे, गुडिया...
राधे मांचा जन्म सर्वसाधरण कुटुंबात झाला. तिचे वडील अजितसिंह वीज विभागात कर्मचारी होते. वडील तिला गुडियाच म्हणायचे. त्यानंतर गावातील लोकही तिला गुडिया नावानेच हाका मारायचे. शाळेत टाकायची वेळ आली तेव्हा तिचे नाव सुखविंदर कौर ठेवण्यात आले. दहावीपर्यंत तिचे शिक्षण झाले आहे. यावेळी गावातील काली माता मंदिरात ती बराचसा वेळ घालवायची. तिचा व्यवहार विचित्र होता. त्यामुळे शिक्षकही तिला विशेष वागणूक द्यायचे.
पती विकायचा मिठाई
राधे मां 17 वर्षांची असताना मोहनसिंह याच्यासोबत लग्न करण्यात आले. सासरची परिस्थितीही सामान्य होती. पती आणि दिर गावात मिठाईचे एक छोटेसे दुकान चालवायचे. त्यांचे एकत्र कुटुंब होते. घराच्या खर्च जसा तसा चालायचा. लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी मोहनने दोहा आणि कतारमधील बांधकाम कंपन्यांमध्ये काम केले. आता तो भारतात परतला आहे. गावातील लोक त्याला डॅडी तर तिच्या बहिणीला रज्जी मासी असे म्हणतात.
राधे मां करायची शिवणकाम
पती विदेशात गेल्यावर राधे मांने कुटुंबाची जबाबदारी खांद्यांवर घेतली. यावेळी ती शिवणकाम करायची. शेजाऱ्यांकडून आणि बुटीकमधून काम आणून घरी कपडे शिवायची. विशेषतः मुलिंचे सलवार कमीज शिवायची. सुमारे चार वर्ष तिने शिवणकाम केले. यावेळी तिने गावातील काही मुलींना शिवणकामाचे धडेही दिले. 22 वर्षांची असताना तिला दोन मुले होती. पती विदेशात असल्याने राधे मां मुकेरिया येथील परमहंस आश्रमात जायची. येथेच तिची भेट महंत रामदीन यांच्यासोबत झाली होती.
पुढील स्लाईडवर बघा, राधे मांचे फोटो... असे आयोजित केले जातात कार्यक्रम... अशी जमते गर्दी....