आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांसाठी घालते मिनीस्कर्ट, तेच करतात मेकअप, राधे मांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कौटुंबीक छळ प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राधे मांने पुन्हा एकदा सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मेकअप करणे आणि मिनीस्कर्ट घालण्यावर राधे मां म्हणते, की माझे भाविकच माझा मेकअप करतात. त्यांनीच मला मिनीस्कर्ट घालण्यासाठी दिले. त्यांचे मन राखण्यासाठी मी असे करते. माझे भाविक खुश असतील तर त्यातच माझा आनंद आहे.
राधे मां म्हणाली, मिनीस्कर्ट घालणे वाईट का?
मिनीस्कर्ट घातलेले फोटो व्हायरल होणे आणि त्याबाबत वाद निर्माण होण्यावर राधे मां म्हणाली, की मला या फोटोंची माहिती नाही. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी या फोटोंचा वापर करण्यात आला आहे. मीडियात येत असलेले फोटो माझे वैयक्तिक आहेत. हे फोटो पब्लिश करण्याचा मीडियाला अधिकार नाही. ही त्यांची चुक आहे. या घटनेने मला खुप दुःख झाले आहे.
मां म्हणाली, की मी एक कुटुंबासोबत एका ट्रिपवर गेली होती. माझ्या भाविकांनीच मला हे ड्रेस दिले होते. मी ते घालावेत अशी त्यांची इच्छा होती. हे ड्रेस घालण्यात काय वाईट आहे... हे व्हल्गर नाहीत... साधू आणि साध्वींनी एकाच प्रकारचे कपडे घालायला हवेत, असे तुम्हाला कुणी सांगितले. मी केवळ भाविकांचे ऐकते. ते खुष असतील तर त्यात मला आनंद आहे.
राधे मांने या बाबी एका मुलाखतीत सांगितल्या. एका इंग्रजी पेपरमध्ये ही मुलाखत आली आहे. मेकअप आणि मिनीस्कर्ट घालण्यावर प्रश्नांची उत्तरे तिने दिली आहेत. इतर प्रश्नांची उत्तरे राधे मांचे सहकारी आणि ग्लोबल अॅडव्हटायझिंग कंपनीचे मालक संजीव गुप्ता यांनी दिली.
माझ्याकडे केवळ 8-10 लाख रुपये
राधे मांच्या प्रॉपर्टीबाबत सांगताना गुप्ता म्हणाले, की त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे वृत्त चुकीचे आहे. त्यांच्या बॅंक खात्यात 8-10 लाख रुपये आहेत. सीबीआयला चौकशी करायची असेल तर करता येईल.
नाशिकच्या कुंभ मेळाव्यात...
नाशिकच्या कुंभ मेळ्यात जाण्याबाबत बंदी घालण्यात आल्यावर गुप्ता म्हणाले, की त्या कुंभ मेळ्याचा एक भाग राहिल्या आहेत. त्यांच्या जाण्यावर प्रतिबंध नाही. त्यांना वाटले तर त्या नाशिकला जातील.
जामिनावर...
याबाबत माझ्या वकीलांशी मला बोलावे लागेल. सध्या आम्ही अॅडव्होकेट गिरीश केडिया आणि एच. एस. पोंडा यांच्यासोबत चर्चा करीत आहोत, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.
पुढील स्लाईडवर बघा, राधे मांचे भक्तगण... आणि मिनीस्कर्टमधील फोटो....