आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्सनल ROOM मध्‍ये शरीर संबंधासाठी बळजबरी करत होती राधे माँ; नवा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाविकांसोबत राधे - फाइल फोटो - Divya Marathi
भाविकांसोबत राधे - फाइल फोटो
मुंबई - अश्लीलता पसरवणे आणि हुंड्यासाठी विवाहितेचा छळ या आरोपामुळे चर्चेत आलेली भोंदू साध्‍वी राधे माँ हिच्‍यावर आता लैंगिक अत्‍याचार केल्‍याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाने सोमवारी दिला.
या बाबात अॅड. फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी दाखल केलेल्‍या याचिकेमध्‍ये दावा करण्‍यात आला होता की, राधे ही आपल्‍या भाविक तरूण-तरुणींना आशीर्वाद देण्‍याच्‍या नावावर पर्सनल रुममध्‍ये घेऊन जात होती आणि त्‍या ठिकाणी त्‍यांना बळजबरीने सेक्‍स करायला भाग पाडत होती.
संस्‍थेची नोंदणीसुद्धा नाही
भट्ट यांनी न्‍यायालयात सांगितले की, अनेक प्रसिद्ध व्‍यक्‍ती या राधे हिच्‍या दरबारात जातात. तिच्‍या या व्‍यवसाय करण्‍यासाठी एजंट नियुक्‍त केलेले आहेत. पण, देवीच्‍या दरबारात अनेक गैरव्‍यवहार चालत असत. ज्‍या संस्‍थेच्‍या नावावर राधे ही भक्‍तांकडून देणगी घेत होती त्‍या संस्‍थेची नोंदणीच धर्मदाय आयुक्‍तांकडे नाही. धर्माच्‍या नावावर ती सेक्स रॅकेट चालवते. मात्र, असा गंभीर प्रकार असतानाही पोलिसांनी केवळ तिचे बयाण नोंदवून घेतले, असा आरोप त्‍यांनी केला.
पोलिसांना मागितले प्रतिज्ञापत्र
या प्रकरणी पोलिसांनी काय तपास केला याचा दोन पानांचा अहवाल सरकरी वकिलांनी न्‍यायालयात सादर केला आणि अजून तपास सुरू असल्‍याचा युक्‍तवाद केला. हा अहवाल पाहिल्‍यानंतर न्‍यायालयाने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्‍याचे आदेश दिले.
पुढील स्लाइड्सवर पाहा राधे हिचे निवडग फोटोज...