आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधेमाँच्या विरोधात समन्स, शुक्रवारी हाेणार चाैकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शनिवारी मध्यरात्री नांदेडहून मुंबईत दाखल झालेल्या स्वयंघोषित गुरू राधेमाँ हिच्या बोरिवली येथील घरी जाऊन मुंबई पोलिसांनी तिला चौकशीसाठीचे समन्स बजावले अाहे. येत्या शुक्रवारी राधेमाँची चौकशी केली जाणार आहे. कांदिवली येथील निकी गुप्ता यांच्या तक्रारीच्या चौकशीसंदर्भात हे समन्स बजावण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर चाैकशीत पाेलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया राधेमाँने दिली आहे.
रविवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी बोरिवली येथील नंदनंदन भवन या गुप्ता कुटंुबीयांच्या मालकीच्या इमारतीत असलेल्या राधे माँच्या निवासस्थानी जाऊन चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली. पहिल्यांदा राधे माँ घरी नसल्याचे उत्तर देत घराखाली असलेल्या तिच्या भक्तांनी समन्स स्वीकारण्यास नकार दिला होता. शुक्रवारी दुपारी बारा वाजता तिला चौकशीसाठी कांदिवली पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निकी गुप्ता या महिलेने दाखल केलेल्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीवरून कलम ४९८ (अ)अंतर्गत हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जिसका नाम है, वही तो बदनाम होता है
‘माझ्या वरचे सर्व आरोप निराधार आहेत,’ अशी प्रतिक्रिया राधेमाँने माध्यमांकडे दिली. निकी गुप्ता हिच्या तक्रारीविषयी विचारले असता ‘तो गुप्ता कुटुंबीयांचा कौटुंबिक मामला असून त्याबद्दल मला काहीही देणे-घेणे नाही..आय डोंट केअर,’ असे ती म्हणाली. आपल्यावर त्यांनी वैयक्तिक आरोप केल्याचा संदर्भ देताच " जिसका नाम होता है, वही तो बदनाम होता है' असा फिल्मी डायलॉगही राधेमाँने सुनावला.
पुढील स्‍लाइडमध्‍ये पाहा राधे मॉं चे काही फोटो...