आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधेमाँला अंतरिम जामीन, दाेन अाठवड्यांपर्यंत अटक न करण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हुंड्यासाठी सुनेचा छळ करण्यासाठी व्यापाऱ्याला प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सुखविंदर काैर ऊर्फ स्वयंघाेषित गुरू राधेमाँला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच तिला दाेन अाठवड्यांपर्यंत अटक न करण्याचे अादेशही पाेलिसांना दिले अाहेत. दरम्यान, कांदिवली पाेलिसांनी या प्रकरणात राधेमाँची शुक्रवारी सुमारे चार तास कसून चाैकशी केली.

दोन आठवड्यांपूर्वी निक्की गुप्ता या महिलेने राधे माँसह सासरच्या मंडळींविराेधात काैटुंबिक छळाची तक्रार दाखल केली हाेती. राधे माँ हिच्या या तक्रारीवरून राधे माँसह सातही जणांवर गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे. गुरुवारी दिंडाेशी सत्र न्यायालयाने या प्रकरणात राधे माँला अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. शुक्रवारी न्यायालयाने तिला सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. अाता तिला दर बुधवारी न्यायालयासमाेर हजेरी द्यावी लागेल. तसेच ज्या महिलेने राधे माॅँविराेधात छळाची तक्रार दिली अाहे, तिच्या सासरच्या मंडळींना अाधी अटक करायला हवी, असे मतही न्यायमूर्तींनी व्यक्त केले. दरम्यान, या प्रकरणात कांदिवली पाेलिसांनी शुक्रवारी दुपारी सुमारे चार तास राधेमाँची कसून चाैकशी केली. गुरुवारी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर राधेमाँ चाैकशीसाठी पाेलिसांसमाेर हजर झाली. हाती त्रिशूळ घेऊन व काही भक्तांसमवेत ती पाेलिस ठाण्यात गेली. मात्र नंतर तिच्या भक्तांची माेठी गर्दी झाली.