आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhe Maa Decline Allegations Demand Cbi Inquiry

\'...खूशबू आ नही सकती कागज के फूलों से\', राधे माँची पत्रकार परिषदेत शायरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत प्रेस कॉन्फरन्स दरम्यान राधे माँ. - Divya Marathi
मुंबईत प्रेस कॉन्फरन्स दरम्यान राधे माँ.
मुंबई - हुंड्यासाठी अत्याचार आणि अश्लिलता पसरवण्याच्या आरोपाने घेरल्या गेलेल्या राधेमाँने पुन्हा एकदा निर्दोष असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर तिने तिच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राधेमाँने शायरी केली, \'\'सच्चाई छुप नही सकती बनावट के वसूलों से, खूशबू आ नहीं सकती कागज के फूलों से।\'\'

काय म्हणाली राधेमाँ...
स्वतःला देवीचा अवतार असल्याचे सांगणारी राधे माँ म्हणाली, मी पूर्णपणे निर्दोष, शुद्ध आणि पवित्र आहे. जे भक्त माझ्याकडे येतात त्यांच्यावर देवाची कृपा होते. मीडिया, पोलिस आणि कायद्यावर माझा विश्वास आहे. देव नक्की न्याय करेल.