आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळ्यात नोटांचा हार घालत होती राधे मॉ, भाविक करायचे मेकअप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधे मॉंचा मेकअप करताना भक्त - Divya Marathi
राधे मॉंचा मेकअप करताना भक्त
मुंबई- स्वंयघोषित आध्यात्मिक गुरु राधे मॉं खळबळजनक आरोपांमुळे अडचणीत सापडली आहे. त्यात राधे मॉंचे आणखी काही फोटो समोर आले आहेत. राधे मॉंने गळ्यात नोटांचा हार घातला असून एक भक्त तिचा मेकअप करत असल्याचे दिसत आहे. भक्त राधे मॉंच्या ओठांवर लिपस्टिक व हातापायांच्या नखांना पॉलिश लावताना दिसत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, मॉडेल व अभिनेत्री आर्शी खानने हिने राधे मॉंवर सेक्स रॅकेट चालवण्याचा तर अभिनेत्री डॉली बिंद्राने राधे मॉं विरुद्ध बोरीवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राधे मॉंने आपली फसवणूक केल्याचे डॉली बिंद्राने तक्रारीत म्हटले आहे.

किन्नर देखील राधे मॉंचे भक्त
मशहूर ट्रान्सजेंडर एक्टिविस्ट लक्ष्मी नारायण त्रिपाठी ही देखील राधे मॉंची भक्त आहे. लक्ष्मी व तिचे सहकारी नेहमी राधे मॉंसोबत दिसत होते. काही दिवसांपूर्वी राधे मॉंचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते. लक्ष्मी नारायण त्रिपाठीने तिच्या फेसबुक पेजवर राधे मॉंला समर्थन दिल्याचे म्हटले आहे.

कोण आहे राधे मॉं?
राधे मॉं पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. बिझनेसमन सरदार मोहन सिंगसोबत तिचा विवाह झाला. मात्र, विवाहानंतर ती एक महंताच्या संपर्कात आली. महंताकडून तिने दीक्षा घेऊन आध्यात्मिक जीवन स्विकारले. काही वर्षांपूर्वी मुंबईत आल्यानंतर राधे माला प्रसिद्धी मिळाली. राधे मॉं स्वत:ला अष्टभूजा देवीला अवतार समजते.


या आरोपांमुळे राधे मॉं अडचणीत...
> राधे मॉं भक्तांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप फॅशन डिझायनर कपिल अरोराने केले होता. राधे मॉंने तिच्या ओळखीतील 24 वर्षीय युवर्तीचे लैंकिक शोषण केले होते.

> अभिनेत्री डॉली बिंद्राने देखील राधे मॉंविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. राधे मॉं आपल्या भक्तांना पोर्न व्हिडिओ दाखवते.

>राधे मॉंवर सेक्स पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे.

>हिमाचल प्रदेशातील एका मंदिराच्या पुरोहितांने राधे मॉंवर आरोप केला आहे. राधे मॉंच्या सांगण्यावरुनच्या त्यांच्या दोन भक्तांना ठार मारण्याची धमकी ‍देण्यात आली होती.

>राधे मॉंवर मुंबईतील एका बिझनेसमनच्या सुनेने हुंड्यासाठी पती आणि सासरच्या लोकांना भडवल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील बोरीवली पोलिसांत याप्रकरणी राधे मॉंसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

>राधे मॉंची स्कर्टवरील छायाचित्रे समोर आल्यानंतर मुंबईतील वकील फाल्गुनी ब्रह्मभट‌्टने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राधे मॉं धर्माच्या नावा खाली जनतेची फसवणूक करता आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, भक्त असा करतात राधे मॉंचा MAKE UP....