आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे माँने कसिनोमध्ये डांस, व्हिडिओ व्हायरल, २५ हजारांवर मिळाला जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधे माँ - Divya Marathi
राधे माँ
मुंबई - पोलिसांना आवश्यकता भासल्यास चौकशीसाठी हजर राहण्याच्या अटीवर स्वयंघोषित अाध्यात्मिक गुरू राधेमाँ हिला पंचवीस हजारांच्या जात मुचलक्यावर उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. निकी गुप्ता या महिलेच्या तक्रारीवरून आपल्याला अटक होईल या भीतीने राधेमाँ हिने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला हाेता. त्याआधी १३ आॅगस्ट रोजी सत्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता.

गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांनी राधे माँ आणि मुंबई पोलिस आणि तक्रारदार महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी न्यायलयाने तिला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. मुंबईतील एक व्यावसायिक एम.एम.मिठाईवाला यांची सून असलेल्या निकी गुप्ता यांनी ५ ऑगस्ट रोजी राधे माँ आणि आपल्या सासरच्या सहा जणांविरोधात मानसिक आणि शारीरिक छळाची तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर कांदिवली पाेलिसांनी राधे माँ आणि निकी गुप्ता यांच्या कुटंुबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब नांेदवला होता. त्यामुळे अटकेच्या भीतीने राधे माँने मुंबईतून पळ काढला होता. त्यानंतर मुंबईत येताच तिने प्रथम सत्र न्यायालय आणि मग उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

सुनावणीदरम्यान अॅड. आबाद पोंडा म्हणाले, राधे माँ वगळता इतर सहा आराेपींना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच दोन वर्षांपासून तक्रारदार विरुद्ध तिचे कुटुंबीय यांच्यादरम्यान कौटंुबिक प्रकरणांसंबंधीच्या न्यायालयात खटला प्रलंबित आहे. या कालावधीत कधीही तक्रारदाराने राधेमाँ विरोधात तक्रार केली नव्हती. त्यामुळे आत्ताच राधे माँविरोधात होत असलेल्या आरोपांचे प्रयोजन काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या अगोदर झालेल्या सुनावणीदरम्यान राधे माँ हिने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

‘अापल्याला गाेवले’
तक्रारदाराच्या सासरकडची मंडळी आपली भक्त असल्याने विनाकारण आपल्याला या प्रकरणात गोवल्याचेही राधे माँने स्पष्ट केले आहे. आपले नाव यात गोवल्यास कौटंुबिक न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात सासरच्या मंडळींवर दबाव येईल म्हणून कदाचित या प्रकरणात आपल्याला गोवल्याचा आरोपही राधे माँ हिने तक्रारदार निकी गुप्ता यांच्यावर केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, कसिनोमध्ये डांस करतानाचा व्हिडिओ