आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhe Maa Said I Do Not Have Any Complaints, Questions, The Reporter Put The Neck

VIDEO : माझी कोणाविरुद्धच तक्रार नाही; प्रश्‍न वाढले तर पत्रकाराला मारली मिठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा


मुंबई - हुंड्यासाठी छळाचा आरोप असलेल्‍या राधे माँला म्‍हणाली, माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही. जे काही होत आहे ते इश्‍वराच्‍या इच्‍छेने होत आहे. मनुष्‍याच्‍या हातात काहीही नाही, असे स्‍वष्टिकरण तिने दिले. दरम्‍यान, पत्रकारांनाकडून एकापाठोपाठ प्रश्‍न विचारले जात असल्‍याने पाहून तिने एका टीव्‍ही पत्रकाराच्‍या तोंडावरून हात फि‍रवला आणि त्‍याची गळाभेट घेतली. दरम्‍यान, पोलिसांनी हुंडाविरोधी कायद्यान्‍वे राधे माँ ला समन्‍स पाठवली.

वेबसाइड हॅक करून शिव्‍या घातल्‍या
वादग्रस्‍त धर्मगुरू राधे माँ हिची ऑफिशियल वेबसाइट www.radhemaa.com अज्ञात व्‍यक्‍तीने हॅक केल्‍याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. एवढेच नाही तर राधे माँने घातलेला मिनी स्कर्ट आणि भाविकांना मिठ्ठी मारतानाचे फोटोही हॅकरने यावर टाकले असून, राधे माँ हिला शिव्‍या घातल्‍या आहेत. तसेच लोकांना मुर्ख बनवण्‍याचा व्‍यवसाया थांबवणे सांगून लोकांनीही सद्सद् विवेकबुद्धीने विचार करण्‍याचा संदेश त्‍यावर लिहिला आहे.
काय लिहिले मॅसेजमध्‍ये
हॅकरने वेबसाइट हॅक केल्‍यानंतर राधे माँच्‍या विरुद्ध मॅसेज पोस्ट केला आहे. मॅसेजमध्‍ये म्‍हटले, ''स्‍वत:ला देवी म्‍हणणा-या राधे मांची पूजा करणे बंद करा. भारत हा सर्वात मोठा आणि सोपा उद्योग बनला आहे. आपण अगदी सहजतेने अशा गोष्‍टींवर विश्‍वास ठेवतो. आता तरी जागे व्‍हा. यश प्राप्‍त करण्‍यासाठी मेहनत करावी लागते, स्‍वत:ला देव म्‍हणणा-यांची पूजा नाही. एखादा स्‍वयंघोषित संत आपल्‍याला सांगतो, समोस्‍यासोबत चटनी खात जा, देवाची कृपा होईल. मात्र, तुम्‍ही मुर्ख बनू नका. स्‍वत:वर विश्‍वास ठेवा.
कोण आहे राधे माँ...
राधे माँचे खरे नाव सुखविंदर आहे. तिचा जन्म 4 एप्रिल 1965 रोजी पंजाबच्या गुरुदासपूरमधील रंगाला येथील एका सिख कुटुंबात झाला. वयाच्या 18 व्या वर्षी तिचे लग्न मुकेरियाच्या मानमोहनसिंग नावाच्या तरुणासोबत झाले होते. लग्नानंतर राधे माँचा नवरा नोकरीच्या निमित्ताने कतरची राजधानी दोहा येथे निघून गेला. हलाखीची परिस्थिती असल्याने राधे माँ शिवणकाम करुन घराचा खर्च चालवायची. वयाच्या 21 वर्षी ती महंत रामाधीन परमहंस यांना शरण गेली. परमहंस यांनी सुखविंदरला सहा महिन्यांपर्यंत दीक्षा दिली. त्यानंतर तिचे नाव राधे माँ पडले आणि ती मुंबईत आली.
राधे माँवर काय आहे आरोप?
- मुंबईतील एका विवाहितेने तिच्या सासरच्या मंडळींसह राधे माँवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचा आरोप आहे, की तिच्यासासरची मंडळी राधे माँचे भक्त आहेत आणि राधे माँ सांगेल तेच ते करत असतात. माझ्याकडून पैशांची आणि मौल्यवान वस्तूंची मागणी करण्यास राधे माँच सांगत होती, असा विवाहितेचा आरोप आहे.

- राधे माँचे स्कर्ट परिधान केलेली छायाचित्रे समोर आल्यानंतर मुंबईची एक वकील फाल्गुनी ब्रह्मभट‌्टने आणखी एक तक्रार दाखल केले. वकिलाने आपल्या तक्रारीत सांगितले, की राधे माँ धर्मांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे. ती अश्लिलतासुध्दा पसरवत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संबंधित फोटोज...