आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्‍त राधे माँची वेबसाइड हॅक; स्‍कर्टमधील फोटो टाकून शिव्‍या घातल्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वादग्रस्‍त धर्मगुरू राधे माँ हिची ऑफिशियल वेबसाइट www.radhemaa.com अज्ञात व्‍यक्‍तीने हॅक केल्‍याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. एवढेच नाही तर राधे माँने घातलेला मिनी स्कर्ट आणि भाविकांना मिठ्ठी मारतानाचे फोटोही हॅकरने यावर टाकले असून, राधे माँ हिला शिव्‍या घातल्‍या आहेत. तसेच लोकांना मुर्ख बनवण्‍याचा व्‍यवसाया थांबवणे सांगून लोकांनीही सद्सद् विवेकबुद्धीने विचार करण्‍याचा संदेश त्‍यावर लिहिला आहे.
काय लिहिले मॅसेजमध्‍ये
हॅकरने वेबसाइट हॅक केल्‍यानंतर राधे माँच्‍या विरुद्ध मॅसेज पोस्ट केला आहे. मॅसेजमध्‍ये म्‍हटले, ''स्‍वत:ला देवी म्‍हणणा-या राधे मांची पूजा करणे बंद करा. भारत हा सर्वात मोठा आणि सोपा उद्योग बनला आहे. आपण अगदी सहजतेने अशा गोष्‍टींवर विश्‍वास ठेवतो. आता तरी जागे व्‍हा. यश प्राप्‍त करण्‍यासाठी मेहनत करावी लागते, स्‍वत:ला देव म्‍हणणा-यांची पूजा नाही. एखादा स्‍वयंघोषित संत आपल्‍याला सांगतो, समोस्‍यासोबत चटनी खात जा, देवाची कृपा होईल. मात्र, तुम्‍ही मुर्ख बनू नका. स्‍वत:वर विश्‍वास ठेवा.

हा कट असल्‍याचे संस्‍थेचे स्‍पष्‍टीकरण
मातामणी श्री राधे गुरु मां चॅरिटेबल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी संजीव गुप्ता म्‍हणाले, ''कुणी तरी आमची वेबसाइड हॅक केली आहे. राधे माँला बदनाम करण्‍याचा हा डाव आहे.''
पुढील स्‍लाइड्वर पाहा संबंधित फोटोज...