आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोपलवार यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एकाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणात आणखी एका आरोपीला ठाणे खंडणीविरोधी पथकाने डोंबिवलीतून अटक केली आहे. या आरोपीने मोपलवार यांची ध्वनिफीत तयार करण्यास मदत केल्याची बाब तपासात पुढे आली आहे. त्यामुळेच पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून राधेश्याम मोपलवार यांची हकालपट्टी करण्यास एक ध्वनिफीत कारणीभूत ठरली होती. ही ध्वनिफीत तयार करणाऱ्या सतीश मांगले आणि त्याची दुसरी पत्नी श्रद्धा या दोघांना मोपलवार यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी अटक केली होती. त्यापाठोपाठ या प्रकरणात अतुल भारत तावडे याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने डोंबिवलीतून अटक केली.
तो नालासोपारा भागात राहतो. या प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश मांगले याच्या पहिल्या पत्नीचा तो भाऊ असून तो सतीशचा अंगरक्षक म्हणून काम करीत होता.

मोपलवार यांची ध्वनिफीत तयार करण्यास त्यानेच मदत केल्याची बाब तपासात पुढे आली असून त्यामुळेच पोलिसांनी त्याला या प्रकरणात अटक केली आहे. सतीश, त्याची पत्नी श्रद्धा आणि मेव्हुणा अतुल या तिघांना ठाणे न्यायालयाने 8 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...