आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार कुचेंविरुद्ध एफआयआर का नाही? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या जाचाला कंटाळून अापण कुटुंबासह अात्महत्या करणार असल्याचा इशारा बदनापूरचे पोलिस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी दिला हाेता. राज्य सरकारने पावणेदोन वर्षात कुचे यांच्या दबावात बदनापूरमधील सात पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्याचा अाराेप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी केला. काळेंच्या तक्रारीनंतर कुचे यांच्याविरोधात गुन्हा दाखल का केले जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

आमदारांच्या शिवीगाळीची सरकारला पुराव्यांसह माहिती दिल्यानंतरही संबंधित आमदारावर कारवाई होत नसल्याने पोलिस निरीक्षक विद्यानंद काळे आत्महत्या करणार होते. राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या पावणेदोन वर्षात बदनापूर येथे सात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सरकार सत्तेत आले तेव्हा प्रशांत देशपांडे हे निरीक्षक होते. त्यंाची बदली जानेवारी २०१५ मध्ये झाली. त्यांच्या जागेवर आलेल्या शंकर पटवारी यांची फक्त दोनच महिन्यांत, तर त्यानंतर आलेले महेंद्र जगताप यांची अवघ्या १२ दिवसांत ३० मार्च २०१५ रोजी बदली झाली. त्यांच्या जागेवर आलेल्या डॉ. प्रियंका नारनवरे यांची तीन महिन्यांत, तर त्यांच्यानंतर आलेले शीतलकुमार बल्लाळ यांची अवघ्या पाच महिन्यांत बदली झाली. बल्लाळ यांच्या जागेवर आलेले महादेव राऊत यांची केवळ १० दिवसांत बदली करण्याचा पराक्रम राज्य सरकारने केला आहे. त्यंाच्या जागी आलेले रफिक शेख यांची सुमारे सात महिन्यांतच बदली करण्यात आली, असे विखे म्हणाले.

हे सरकार जनतेला काय न्याय देणार ?
अशा आमदारांना पाठीशी घालणारे सरकार पोलिसांना आणि जनतेला काय न्याय देणार? पोलिसांवरील हल्ल्यांबाबत सरकार प्रामाणिक असते तर आतापर्यंत कुचेंवर गुन्हा दाखल झाला असता, असेही विखे म्हणाले. मी एसपींशी बोललो, त्यांनी अहवाल आल्यावर कारवाई करू, असे सांगितले. काळेंनी दिलेली ऑडिओ क्लिप हा अहवाल आहे. त्यावर कारवाई करा, असे मी सुचवल्याचे विखे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...