आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवेसेनेचा बेरंग,\'पद नसलेल्यांकडे सर्वाधिकार\'; एका नार्वेकरांची दुस-या नार्वेकरांवर टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानपरिषदेच्या निवडणूुकीतून माघार घेऊन चर्चेत आलेले शिवसेना आणि युवासेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी धुलिवंदनाच्या दिवशी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनामध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्याच वेळी पवार यांनी नार्वेकर यांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

शिवसेना सोडण्याचा निर्णय त्रासदायक असल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले. जेव्हा पक्षात घुसमट होेते, अंतर्गत राजकारणाचे बळी ठरतो तेव्हा पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो, असे सांगत त्यांनी शिवसेना नेतृत्वावर हल्ला केला. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनाबाहेर निदर्शने केली. नार्वेकरांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

नार्वेकर म्हणाले, 'विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेण्याची संपूर्ण कल्पना शिवसेना नेतृत्वाली होती. आदल्या रात्री साडे अकरा पर्यंत मी शिवसेना भवनात होतो.' घोडेबाजार रोखण्यासाठी माघार घेण्याचे ठरले होते. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाला अंधारात ठेवून उमेदवारी मागे घेतलेली नव्हती, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

इतकी वर्षे शिवसेनेत काम केल्यानंतर पक्ष सोडण्याच निर्णय क्लेशदायक असल्याचे नार्वेकर म्हणाले. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेत पद नसलेल्यांकडे सर्वाधिकार असल्याची टीका मिलिंद नार्वेकर यांचे नाव न घेता केली. राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केलेला विश्वास सार्थ करुन दाखविल, असे सांगत त्यांनी मावळ लोकसभा विजयाचा दावा केला.

पुढील स्लाइडमध्ये, आमच्याकडेही चहावाले आणि पानपट्टीवाले आहेत..