आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी मराठवाड्यात, परभणी-नांदेडमध्ये आज मेळावे, नारायण राणेंची मात्र दांडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी एक दिवसाच्या मराठवाडा दौ-यावर पोहचले आहेत. नांदेड व परभणी येथे त्यांचा दौरा होईल. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची सायंकाळी सभा होणार आहे तर त्याआधी ते परभणी जिल्ह्यातील शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये जाण्यासाठी उतावीळ झालेले नारायण राणे यांनी मात्र राहुल गांधींच्या दौ-याकडे पाठ फिरवली आहे. राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांची कोकणात आज सकाळी 11 वाजता बैठक बोलावली आहे. त्यामुळे राणेंचा भाजपमध्ये प्रवेश कधी होईल तो होईल पण त्यांनी काँग्रेसपासून अंतर राखण्यास सुरुवात केल्याचा स्पष्ट संदेश यातून गेला आहे. 
 
राज्यात काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले तेही मराठवाड्यातील. नांदेड आणि परभणी-हिंगोलीतून काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे मोदी लाटेतही तग धरून राहिले. नेमक्या त्याच भागात राहुल गांधींचा आजचा दौरा आहे. नांदेड महापालिकेच्या निवडणूक या महिन्यात होत आहे. सध्या नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे पण निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच आयाराम, गयारामांनी पक्षांतराला सुरुवात केली आहे. आतापर्यंत विद्यमान 81 पैकी 15 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्यातील 11 जणांनी तर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित चार नगरसेवकही भाजपच्या वाटेवर आहेत. काँग्रेसच्या पाच जणांनी भाजप प्रवेश केला आहे. या गळतीमुळे काँग्रेसला आगामी महापालिकेची निवडणूक जड जाणार आहे. ही गळती रोखण्यासाठी पक्षाला उभारी देण्यासाठीच राहुल गांधी यांच्या उपस्थितीतील विभागीय मेळाव्याची मात्रा लागू पडणार हे पाहावे लागेल.
 
दुसरीकडे, राहुल गांधींच्या टीममधील एक शिलेदार म्हणून खासदार राजीव सातव यांच्याकडे पाहिले जाते. राहुलचे निकटवर्तीय असल्यानेच त्यांची गुजरात राज्य प्रभारीपदी निवड झाली आहे. सातव यांनी आपल्या मतदारसंघात राहुल गांधींच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे नियोजन केले आहे. शेतकरी आत्महत्या, शेतीमाल भाव व एकून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर बोट ठेवण्यासाठी सातव यांनी राहुल यांना पाचारण केले आहे. या मेळाव्यात राहुल मोदी सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या परभणी महापालिकेत काँग्रेसने सत्ता मिळवली होती. त्यामुळे काँग्रेसचा ज्या काही थोड्याफार भागात प्रभाव तेथे अधिक बळकटी आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
 
पुढे वाचा, राणेंची दांडी, कोकणात बैठकांचा धडाका.....
बातम्या आणखी आहेत...