आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS ने महात्मा गांधीजींना मारले, भिवंडीत राहुल गांधींचा हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसारणी देशाला घातक आहे. त्यांच्याच विचारसारणीने राष्ट्रपिता महात्मा गांधींने मारले, असा घाणाघात राहुल गांधी यांनी भिवंडीतील सभेत विरोधकांवर चढविला.
राहुल गांधी सध्या महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौ-यावर आहेत. बुधवारी त्यांनी धुळे, औरंगाबाद येथे रोड शो, जनसभेला संबोधित केले होते. त्यानंतर काल सायंकाळी ते मुंबईत दाखल झाले होते. संपादक मंडळींशी चर्चा केल्यानंतर ते वर्सोवा येथे कोळी बांधवाशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर राहुल गांधी ठाणे, भिवंडी भागात दौरा केला. शेवटी सोनाळे येथे जाहीर सभा घेतली तेथे राहुल यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि आरएसएसची विचारसारणी देशाला घातक आहे. ते देश, समाज, धर्माच्या तोडा-तोडाची भाषा करीत कृती करतात. सरदार पटेल काँग्रेसचे नेते होते. त्यांनी आरएसएसबाबत आपली भूमिका आपल्या पुस्तकात लिहली आहे. आरएसएसला त्यांचा प्रचंड विरोध होता. त्यामुळेच संघावर बंदी घालण्याची मागणी नेहरूंकडे केली होती. असे असतानाही ते केवळ गुजरातचे असल्याने ते आमचे नेते म्हणून खोटे सांगतात. आम्ही सर्वांना सोबत विकास करू शकतो. गरीब, आदिवासी, महिला, हिंदू, मुस्लिम आदी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन देशाला पुढे घेऊन जात आहोत. विरोधकांना हे नको आहे, असे सांगत त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे राहुल गांधी यांनी सांगितले.
चांगल्या गोष्टींना भाजपचा नेहमीच विरोध होतो. अन्न सुरक्षेला विरोध, राजीव गांधींनी कॉम्प्युटर युग आणले तेव्हा नोक-या जातील म्हणून यांनीच गवगवा केला आणि आयटी क्षेत्राचे ते आता श्रेय घेऊ पाहत आहेत. पण देशाला सगळे माहित आहे. लोकांना तुम्ही मुर्ख बनवू शकत नाही. महाराष्ट्राच्या भूमितूनच काँग्रेस जन्म झाला. महाराष्ट्राचे सर्वच क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. या राज्याने देशाला नेहमीच चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. येथील लोकांकडून खूप काही शिकायला मिळते. मी जेव्हा-जेव्हा येथे येतो तेव्हा मला काहीतरी नविन शिकायला मिळते त्यामुळे येथे आल्याचा नेहमीच आनंद मिळतो, असे राहुल यांनी सांगितले.