आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Discussion With Media Persons & Editors In Mumbai

राहुल गांधींचा मुंबईत संपादकांशी संवाद; कोळी बांधवांशीही भेटून जाणल्या समस्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राहुल गांधी यांनी आज सकाळी मुंबईत सुमारे 70 संपादक व वरिष्ठ पत्रकारांशी चर्चा केली. ही चर्चा सुमारे दीड तास चालली. राहुल गांधी सध्या महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौ-यावर आहेत. बुधवारी त्यांनी धुळे, औरंगाबाद येथे रोड शो, जनसभेला संबोधित केले होते. त्यानंतर काल सायंकाळी ते मुंबईत दाखल झाले होते. संपादक मंडळींशी चर्चा केल्यानंतर ते वर्सोवा येथे कोळी बांधवाशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर राहुल गांधी ठाणे, भिवंडी भागातील दौ-यावर जाणार आहेत. तसेच सोनाळे येथील जाहीर सभा घेणार आहेत.
संपादक मंडळींशी राहुल गांधी यांनी सुमारे दीड तास चर्चा केली. या चर्चेत सहभागी झालेल्या एका संपादकाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांची संपादकांसोबत झालेली चर्चा अतिशय सकारात्मक झाली. राहुल गांधी आत्मविश्वासाने बोलत होते. तसेच त्यांच्यात कुठेही बोलताना कमतरता किंवा उडवीउडवीची उत्तरे दिली नाहीत. संपादकांनी जे-जे प्रश्न विचारले त्याची सरळ व थेट उत्तरे दिली. राहुल गांधींना लागलीच सत्ता हवी आहे, त्यासाठी ते लोकांशी संवाद आहेत असे अजिबात वाटत नाही. त्यांना सत्ता मिळविण्यापेक्षा देशातील व्यवस्थेत बदल हवा असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. राहुल गांधी 2014 च्या निवडणुकीची नव्हे तर 2019 ची तयारी करीत असल्याचे दिसते. राहुल गांधी यांनी सत्ता लहानपणापासूनच घरात पाहिलेली व उपभोगलेली आहे. त्यामुळे ते हपापलेले दिसत नाहीत, असे त्यांच्याशी चर्चा करताना जाणवत होते असे या संपादकांनी सांगितले.
मोदी विरूद्ध राहुल गांधी हा मिडियांनी तयार केलेला कल्पनाविलास आहे असे सांगत राहुल यांनी मोदी किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीला विरोध नसून, त्या विचाराला व प्रवृत्तीला विरोध असल्याचे सांगितले. भारत देश विशाल आहे, येथील अस्मिता वेगवेगळ्या आहेत. कोणतीही एक व्यक्ती देश चालवू शकत नाही. सर्वांना बरोबर घेऊन गेलो तर देशाचा समतोल विकास होईल. सामाजिक पातळीवरही देशात एकोपा राहिल असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींना अशोक चव्हाणांबाबत प्रश्न विचारण्यात आला. औरंगाबादमधील सभेत राहुल यांच्या व्यासपीठावर चव्हाण उपस्थित होते. त्याबाबत राहुल यांनी उत्तर दिले नाही. त्यांच्यावतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले. अशोक चव्हाण यांना कोणत्याही तपास यत्रंणेने अद्याप दोषी धरलेले नाही. त्यामुळे त्यांना दोषी मानने योग्य ठरणार नाही असे गोलमाल उत्तर चव्हाण यांनी दिले. मात्र या व्यतिरिक्त सर्व प्रश्नांची राहुल यांनी थेट, सरळ व प्रामाणिकपणे उत्तरे दिल्याची माहिती या संपादकांनी दिली. एकूनच राहुल गांधी आजच्या चर्चेत आत्मविश्वासाने, थेट, सकारात्मक व व्यवस्था परिवर्तनाच्या गोष्टी करीत आहेत असे जाणवते.
कोळी बांधवांशी सुरु असलेल्या संवादातील माहिती वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...