आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Has Arrived At The Wankhede Stadium For Sachin's Farewell Test

सचिनला सलाम ठोकण्यासाठी राहुल गांधी वानखेडेवर, मोदींही हजेरी लावणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सध्या देशभर सचिन तेंडूलकर नावाची लाट आहे. सगळ्या जगाचे लक्ष मुंबईतील कसोटीवर व सचिनच्या खेळाकडे लागले आहे. भारतातील तमाम क्रिकेट चाहते टीव्हीला चिकटून बसले आहेत. तर, राजकीय नेत्यांनी व सेलिब्रेटीं लोकांनी आपले व्यस्त कार्यक्रम रद्द करीत मुंबईतील वानखेडे मैदानावर हजेरी लावली आहे. यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी वानखेडेवर पोहचले आहे. राहुल गांधी वानखेडेवर आढळून आल्यानंतर भाजपनेही मोदींना वानखेडेवर पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे कदाचित मोदीही सचिनला सलाम ठोकण्यासाठी वानखेडेवर येऊ शकतात.
सध्या उत्तरेकडील पाच राज्यात विधानसभा निवडणूकाचा प्रचार शिगेला पोहचला आहे. अशा व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ काढत राहुल यांनी कोणताही गाजावाजा न करता वानखेडेवर हजेरी लावली. मात्र राहुल स्टेडियमवर दिसताच भाजपचा तिळपापड झाला आहे. मोदींना आपण आमंत्रित करायला हवे होते, अशी महाराष्ट्र व मुंबई भाजपला वाटू लागले आहे. त्यानंतरही मोदींना तत्काळ मुंबईत येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, त्यांना ते शक्य आहे का नाही याची माहिती मिळाली नाही. मात्र, आज दिवसभरात मोदी मुंबईत कधीही दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.