आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी देवनार डम्पिंग ग्राऊंडला दिली भेट, पंतप्रधान मोदींवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवनार डम्पिंग ग्राऊंडला भेट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. - Divya Marathi
देवनार डम्पिंग ग्राऊंडला भेट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
मुंबई- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दुपारी देवनाग डम्पिंग ग्राऊंडला भेट देऊन त्याबाबत माहिती घेतली. मागील महिन्यात देवनार डम्पिंग ग्राऊंडला तीन वेळा भयंकर आग लागली होती. यामुळे मुंबईकरांना धुरामुळे मोठा त्रास सहन करावा लागला होता. राहुल यांनी देवनार डेपोला भेट दिल्यानंतर त्यांनी भाजप-शिवसेनेवर टीका केली.
राहुल म्हणाले, देवनार ़डम्पिंग ग्राऊंड हे शहरात आहे. यामुळे येथील लाखो लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुलांना टीबीसारखे आजार होत आहेत तर लोक आजारी पडत आहेत. एका लहान बाळाचाही यामुळे मृत्यू झाला आहे. भाजप-शिवसेनेने याचे राजकारण न करता हा प्रश्न सोडवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यातून मार्ग काढण्यासाठी काहीही धोरण नाही. पंतप्रधान स्वच्छ भारताची बाता मारतात आणि काहीही करीत नाहीत हे स्पष्ट झाले आहे. बाता मारणे आणि कृती करणे या दोन गोष्टी किती वेगवेगळ्या आहेत हे मोदींना आता समजत असेल अशी टीका राहुल गांधी यांनी त्यांच्यावर केली.
आगामी वर्षी होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर या दौ-यात चर्चा होणार आहे. तसेच मुंबईतील सराफा व्यापा-यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी झव्हेरी बजार येथील व्याप-यांना भेटणार आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना पत्र लिहून, देवनार डम्पिंग ग्राऊंड भेटीदरम्यान खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.
मुंबई महापालिकेतील शिवसेना-भाजप सत्ताधा-याच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी राहुल यांनी मुंबई दौ-याचे नियोजन केले आहे. त्यानुसार, ते मुंबईत काल रात्री उशिरा दाखल झाले आहेत. सध्या चर्चेत असलेल्या देवनार डम्पिंग ग्राऊंडला त्यांनी भेट देण्याचे ठरवले. भाजप आणि शिवसेना यांच्यात देवनार मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. यासोबत अबकारी कराच्या विरोधात गेल्या 40 दिवसापासून संप केलेल्या सराफांसोबत राहुल यांनी चर्चा केली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी वीज, पाणी, आरोग्य, कचरा यांसारख्या प्रश्‍नांवर आंदोलने उभी करण्याची रणणिती आखली आहे. राहुल गांधी यांचा देवनार दौरा हा त्याचाच एक भाग असून, आजी-माजी आमदारांना यानिमित्ताने पुन्हा एकदा सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
भाजप सरकार कुमकुवत वर्गावरच हल्ला करते- राहुल गांधी
सोन्यावर लाखो गरीब लोक अवलंबून आहेत. मोदी सरकारने या गरीबांवरच हल्ला केला आहे. भाजप सरकार कुमकुवत वर्गावरच हल्ला करते. तुमची लढाई तीच माझी व माझ्या पक्षाची लढाई आहे. तुम्ही मला कधीही आवाज द्या मी तुमच्यासाठी हजर राहीन असे सांगत राहुल गांधी यांनी दागिन्यावर कर लावण्यावरून मोदींवर टीका केली. सराफा व्यापा-यांशी झव्हेरी बाजार येथे बोलताना राहुल गांधी यांनी मी व काँग्रेस पक्ष व्यापा-यासोबत असल्याचे सांगितले.
पुढे छायाचित्रातून पाहा, राहुल गांधींनी डम्पिंग ग्राऊंडला भेट दिली त्याचे क्षण...