आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार गरीबांना विसरलंय, शेतकरी-मजूर संकटात- राहुल गांधींची मोदींवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करताना... - Divya Marathi
राहुल गांधी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करताना...
मुंबई- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून दोन दिवसीय (15, 16 जानेवारी) मुंबई दौ-यावर आले आहेत. दुपारी दोनच्या सुमारास त्यांचे मुंबईत आगमन झाले. दुपारी तीन वाजता त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राहुल यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. त्याआधी आज मकर संक्रांत असल्याने राहुल यांनी राज्यातील जनतेला तिळगूळ घ्या गोड बोला अशी साद घालत शुभेच्छा दिल्या.
राहुल गांधी काय म्हणाले...
- मुंबईसारख्या महानगराला स्मार्ट सिटी करण्यासाठी केवळ 100 कोटी रूपये. यात हे शहर स्मार्ट कसे होणार
- महापालिका निवडणुकीत मुंबईत काँग्रेसचा महापौर बनला पाहिजे
- मुंबईत काँग्रेस जिंकली तरच आपण महाराष्ट्र जिंकू शकू
- महाराष्ट्रातील लोकांच्या नसानसात काँग्रेसचा विचार, कार्यकर्त्यांनी लोकांसमोर जाणे गरजेचे
- भाषणं, इव्हेंट करून देश, मुंबई स्वच्छ होणार नाही
- जनतेच्या प्रश्नांना, समस्यांना मोदींनी प्राधान्य द्यायला हवे
कडक व चोख सुरक्षा व्यवस्था-
या दौ-यादरम्यान सुरक्षेत कोणतेही चुक राहणार नाही यासाठी काळजी घेण्यात येत आहे.
मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, राहुल यांच्या सुरक्षेसाठी 400 पोलिस कर्मचारी साध्या (सिव्हील) गणवेशवात तैनात राहतील. हे कर्मचारी संपूर्ण दौ-यादरम्यान राहुल यांच्या आसपास असतील. याशिवाय त्या त्या पोलिस ठाण्याअंतर्गत कडक सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांत दोन दिवसापूर्वी झालेला वाद व एकूनच पक्षातील गटबाजी पाहता कोणालाही शक्तीप्रदर्शन किंवा इतर बाबी करता येणार नाहीत यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.
उद्या मोर्चा-
या दौ-यादरम्यान मुंबईतील नागरिकांना वीज बिलात कपात करून दिलासा द्यावा यासाठी शनिवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. आपल्याला माहित असेल की, मुंबई काँग्रेस अध्यक्षा संजय निरूपम यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईतील वीज बिल दर कमी करावेत यासाठी आंदोलन, उपोषण केले होते. निरूपम यांनी राहुल गांधींसमोर पुन्हा याच मुद्यांवर मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. याशिवाय मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी 5 मतदारसंघात राहुल गांधींच्या बैठका व कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.
राहुल गांधी यांच्या दौ-याचा आजचा पहिला दिवस निरूपम यांनी आपल्याच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात कार्यक्रम कसे राहतील याची काळजी घेतल्याचे दिसत आहे. आज सायंकाळी निवडक संपादकांशी ते चर्चा करणार आहेत. त्याआधी दोन वाजता ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील तर चार वाजता ते आझाद मैदान येथे मुरली देवरा हॉलचे उद्घाटन करतील.
'काँग्रेस दर्शन'चे पडसाद
राहुल गांधी यांच्या दौ-यापूर्वी आढावा घेण्यासाठी मुंबई शहर पक्षाच्या वतीने आझाद मैदान येथील काँग्रेसच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान मुंबई काँग्रेसमध्येच प्रचंड राडा झाला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याशी वाद घातला म्हणून निरुपम समर्थक आमदार अस्लम शेख आणि माजी मंत्री नसीम खान यांच्यात जोरदार वादावादी झाली. एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहण्यापासून ते खुर्च्याची फेकाफेकी करण्यापर्यंत या नेत्यांची मजल गेली होती. या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आमदार भाई जगताप यांच्यासारख्या नेत्यांनाही धक्काबुक्की झाली होती. मुंबईतील पक्षातील गटबाजीतील अनोख्या लाथाळ्यांमुळे कार्यकर्त्यांच्या संस्कृतीचे ‘काँग्रेस दर्शन’महाराष्ट्राला झाले होते. त्याबाबत राहुल गांधी संबंधित नेत्यांची कानउघडणी करतील असे बोलले जाते.
संघटनात्मक फेरबदल लवकरच-
राहुल गांधी यांच्या मुंबई दौ-यानंतर प्रदेश काँग्रेससह मुंबई काँग्रेसमध्ये फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. खासदार अशोक चव्हाण यांची निवड गेल्याच वर्षी झाल्याने त्यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहील. मात्र, राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली ते आपल्या कार्यकारिणीत काही बदल करणार असल्याचे कळते.
पुढे वाचा, संजय निरूपम यांची अध्यक्षपदावरून लवकरच उचलबांगडी...
विखे-पाटलांच्या जागी पृथ्वीबाबा?....