आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मांध शक्तींना \'चले जाव\' म्हणण्याची वेळ आली- राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज मराठवाड्याच्या एकदिवसीय दौ-यावर आहेत. राहुल गांधी नांदेडमध्ये पोहचले असून, तेथे त्यांनी शेतकरी मेळाव्यात नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस पक्षाने आपल्या सर्वांना भरपूर दिले आहे. आता काँग्रेस पक्ष मजबूत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. दुस-या पक्षातल्या लोकांना फोडून भाजपा पक्ष वाढवत आहे. पण भाजपसारख्या धर्मांध शक्तींना आता 'चले जाव' म्हणण्याची वेळ आली आहे, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले. 
 
काँग्रेस पक्षाच्या आजच्या मराठवाडा विभागीय मेळाव्याला पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील व इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. नारायण राणेंनी मात्र दांडी मारली. या मेळाव्यात अशोक चव्हाण म्हणाले, 
गांधी परिवार आणि नांदेडचे अतूट नाते राहिले आहे. आताही नांदेडची महानगरपालिका, जिल्हा परिषद, आमदार खासदार काँग्रेस विचाराचेच आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर राज्यात सरकार आहे की नाही असा प्रश्न पडतो.
 
काय काय म्हणाले राहुल गांधी-
 
महाराष्ट्रात तीन वर्षात नऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
- काँग्रेस नेत्यांच्या दबावामुळे राज्य सरकारला कर्जमाफी मोदींनी देशाचे आर्थिक नुकसान केले. 
- शेतक-यांना वाचविणे आणि युवकांना रोजगार देणे या दोन गोष्टीची गरज आहे.
- दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याची घोषणा मोदींनी केली होती आतापर्यंत गेल्यावर्षी एकाही युवकाला नोकरी मिळाली नाही.
-  देशात बेरोजगारी वाढली आहे. रोजगार शिक्षण आरोग्य याबाबतीत मोदी बोलत नाहीत, ते फक्त बुलेट ट्रेन बाबत बोलतात.
- देशात सरकारविरोधात प्रचंड असंतोष, मात्र सरकार लोकांमध्ये भांडणे लावतेय. महाराष्ट्रात मराठा विरूद्ध इतर समाजात भांडणे लावली जात आहेत. 
- पैशाचा वापर करून सत्ता स्थापने हाच भाजपचा एकमेव कार्यक्रम मोदींनी तीन वेळ जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्याचा प्रयत्न तीन वेळा केला.
-  तिथे काँग्रेस पक्षाने विरोध म्हणून आता भाजपची राज्य सरकारे कायद्याला बायपास करून जमीन अधिग्रहण करत आहेत
- जीएसटी मोदींनी नाही काँग्रेसने आणला. हा जीएसटी एक देश एक कर नाही टॅक्सचे पाच स्लॅब आहेत. दर महिन्याला तीन रिटर्न भरावे लागतायेत. जीएसटीमुळे छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले.
- या देशाला जोडण्याचे काम काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले. पंजाबमध्ये दहशतवादाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते लढले. 17 हजार काँग्रेस कार्यकर्त्यांचा पंजाबमध्ये मृत्यू झाला.
- RSS चे किती लोक मेले? Rss वाले फक्त भांडणे लावतात. आता ही ते लावतील, पण काँग्रेस कार्यकर्ता त्याविरोधात खंबीरपणे लढेल.
बातम्या आणखी आहेत...