आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींची उद्या विदर्भात सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या शुक्रवारी (28 मार्च) रोजी विदर्भाच्या प्रचार दौर्‍यावर येत आहेत. वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.

शुक्रवारी सकाळी 11 वाजता राहुल गांधी वर्ध्यात येतील. येथील कॉँग्रेसचे उमेदवार सागर मेघे यांच्या प्रचारार्थ जुने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होईल. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता ते गडचिरोलीतील उमेदवार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या प्रचारार्थ ते वडसा देसाईगंज येथे सभा घेणार आहेत. त्यांच्यासमवेत महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पक्षाचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी आमदार बालाराम बच्चन यांच्यासह कॉँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.