आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाची बदनामी केल्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी कोर्टात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी 11.30 वाजता भिवंडी येथील कोर्टात हजेरी लावली. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी महात्मा गांधींची हत्या संघानेच केली होती असे वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्याने संघाची बदनामी झाली असे सांगत संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात फौजदारी मनहानीचा खटला दाखल केला होता. त्याप्रकरणी भिवंडी कोर्टाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. आज त्यांनी कोर्टात हजर राहून आपली बाजू मांडली. दरम्यान, माध्यमांशी बोलताना राहुल यांनी सांगितले की, या खटल्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असली तरी स्थानिक कोर्टाला मी हजर राहणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मी जो बोलतो ते करीत असतो. कोर्टाचा व त्यांच्या निर्णयाचा आदर म्हणूनच आपण भिवंडी कोर्टात हजेरी लावल्याचे राहुल गांधींनी सांगितले.
राहुल गांधींना आजच्या सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची सूट सुप्रीम कोर्टाने दिली होती. तरीही राहुल गांधी यांनी भिवंडी कोर्टात हजर राहण्यासाठी आज मुंबई गाठली. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने हा खटला स्थगित करणार असल्याचे म्हटले आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी चार आठवड्यात त्यांची बाजू मांडावी अशी नोटिस सुप्रीम कोर्टाने जारी करून पुढील सुनावणीसाठीची 8 जुलै ही तारीख निश्चित केली आहे. आज सकाळी 11.30 वाजता भिवंडी कोर्टात सुनावणी झाली. राहुल गांधी यांनी तेथे काय भाष्य केले याबाबतची माहिती उपलब्ध झाली नाही.
पुढे ऐका व पाहा, भिवंडीत राहुल गांधी काय म्हणाले...